Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ्यात रोज खा ताज्या हिरव्यागार आवळ्याची ताजी चटणी, पाहा रेसिपी- तब्येतीसाठी खास औषध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 18:26 IST

Recipe of amla chutney: टेस्टी आणि पोषक तत्वांनी भरपूर ही आवळा चटणी आपल्याला नक्की आवडेल. याने जेवणाचा आनंद दुप्पट होईल.

Recipe of amla chutney: हिवाळ्यात आवळे खाण्याची चांगलीच मजा असते. आंबट, गोड, तुरट आवळे सगळेच चवीनं खातात. आवळा कॅंडी, मुरांबा, लोणचे सगळेच खातात. पण आपल्याला वेगळं काही हवं असेल तर आवळ्याची चटणी ट्राय करू शकता. टेस्टी आणि पोषक तत्वांनी भरपूर ही आवळा चटणी आपल्याला नक्की आवडेल. याने जेवणाचा आनंद दुप्पट होईल. त्यामुळे ही आम्ही सांगत असलेली आवळा चटणी आपण एकदा नक्की ट्राय केली पाहिजे. चला तर मग पाहुयात या आवळा चटणीची रेसिपी.

आवळा चटणीसाठी साहित्य आंबट-गोड आवळा चटणी बनवण्यासाठी ४०० ग्रॅम आवळे, एक चमचा मनुके, २ मोठे चमटे मोहरीचं तेल, एक छोटा चमचा भाजलेले जिरे, एक छोटा चमचा बडीशेप, मीठ, एक छोटा चमचा तिखट, एक मोठा चमचा भाजलेली बडीशे पावडर, अर्धा चमचा हळद आणि १०० ग्रॅम गूळ हवा.

कशी बनवाल चटणी?

पहिली स्टेप

सर्व आवळे नीट धुवून घ्या. कुकरमध्ये पाणी आणि आवळे घालून 2 ते 3 शिट्ट्या येईपर्यंत उकळा. पर्याय म्हणून आवळे किसूनही वापरू शकता. उकडल्यावर आवळे थंड होऊ द्या.

दुसरी स्टेप

उकडलेल्या आवळ्यांच्या एक-एक फोडी वेगळ्या करा आणि बिया काढून टाका. कढईत तेल गरम करून त्यात जिरे आणि बडीशेप घालून फोडणी द्या.

तिसरी स्टेप

तेलात आवळ्याचे तुकडे घालून मंद आचेवर साधारण 1 मिनिट परतवा. यानंतर हळद, मीठ, लाल तिखट, धण्याची पूड, जिऱ्याची पूड आणि मनुका घालून सर्व मिश्रण 2 मिनिटे शिजवा.

चौथी स्टेप

आता या मिश्रणात भाजलेल्या बडीशेपेची पूड घाला. गोडपणासाठी साखरेऐवजी गूळ वापरा. त्यानंतर आवळ्याच्या चटणीत गूळ घालून 3 ते 4 मिनिटे शिजवा. गूळ वितळत जाईल तसा तो चटणीत नीट मिसळत राहा.

पाचवी स्टेप

अवघ्या अर्ध्या तासात तुमची आंबट-गोड आवळ्याची चटणी तयार होते. दररोज 1 चमचा आवळ्याची चटणी खाल्ल्यास हिवाळ्यात तुमची इम्युनिटी मजबूत राहण्यास मदत होते. आणि सोबतच जेवणाची टेस्टही वाढेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Amla Chutney Recipe: Boost Winter Immunity with this Sweet & Sour Delight

Web Summary : Enjoy amla this winter with a simple chutney recipe! Boil amla, add spices like cumin, turmeric, and jaggery for sweetness. This chutney enhances immunity and adds flavor to your meals.
टॅग्स :अन्नपाककृती