सध्या वातावरणातील गारवा जास्त प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आपल्याला गरमगरम पिण्याची किंवा खाण्याची तलफ लागते.(Tandoori tea recipe) पाहायला गेलं तर चहा हे सर्वांचे आवडते पेय. भारतात चहा हे अनेकांसाठी अमृतच आहे.(Winter special tea) विशेषत: चहा आणि थंडीच नाते हे वेगळंच आहे. दिवसाची सुरुवात, कंटाळा आला की किंवा डोकदुखीवर असरदार उपाय हा एकमेकव चहा असतो.(Smoky kulhad chai) चहा पिऊयात आणि कामाला लागूयात असं अनेकदा म्हटलंही जातं.(Tapri style tea at home) राज्य बदले की चहाची चव देखील बदलते आणि तिची बनवण्याची पद्धत देखील. (Kadak chai recipe)जिभेला चव देणारा, पचन सुधरवणारा, वजन नियंत्रित ठेवणारा आणि सर्वात महत्त्वाचं सर्वाचं मन जिंकणारा चहा मिळाला तर? सगळ्यांनाच आवडेल.(How to make tandoori chai) आतापर्यंत आपण चहाचे अनेक प्रकार पाहिले असतील.(Winter hot drinks India) गोडाचा चहा, गुळाचा चहा, साखरेचा चहा पण कधी तंदुरी चहा प्यायल्या आहात का? हा चहा पिण्यासाठी कुठे लांब जाण्याची गरज नाही. अगदी घरी सोप्या पद्धतीने बनवू शकतो. फक्त पाणी आणि दुधाचे प्रमाण लक्षात ठेवले तर हा चहा आणखी चविष्ट बनतो. पाहूया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती
सावळ्या रंगाच्या मुलींसाठी परफेक्ट लिपस्टिक शेड्स, ५ पर्याय- ओठ दिसतील सुंदर, लूकही येईल खुलून
साहित्य
मोठी वेलची -१ दालचिनीचे तुकडे - १ लवंग - २ ते ३ काळीमिरी - ४ ते ५ हिरवी वेलची - २आल्याचे तुकडे - ३ ते ४तुळशीची पाने - ५ ते ६ सुंठ पावडर - १ चमचा पाणी - १ कप चहा पावडर - १ चमचा साखर - १ छोटी वाटी दूध - १ कप
टम्म फुगलेल्या- मऊ पुऱ्या करा, पिठात कालवा १ गोष्ट- पुऱ्या जराही तेलकट- कडक होणार नाही
कृती
1. सगळ्यात आधी आपल्याला खडा मसाला घ्यावा लागेल. त्यात आल्याचे तुकडे घाला. यात तुळशीची पाने आणि सुंठ पावडर घालून खलबत्त्यामध्ये कुटून घ्या.
2. आता गॅसवर चहाचे भांड ठेवून त्यात पाणी गरम करा. त्यात चहा पावडर घालून पाणी थोडे उकळून द्या. रंग बदलल्यानंतर त्यात चहाचा तयार मसाला घाला. पुन्हा एक उकळी येऊ द्या.
3. यामध्ये साखर घाला. उकळी यायला लागली की दूध घाला. यानंतर चमचा घालून ढवळा. चहाचा रंग हळूहळू बदलेल.
4. आता एका छोट्याशा मातीच्या भांड्याला गॅसवर शेकवून घ्या. त्यानंतर एका भांड्यात मातीचे भांडे ठेवून त्यात उकळवलेला चहा घाला. तयार होईल फक्कड, टपरीसारखा तंदुरी चहा घरच्या घरी.
Web Summary : As the weather turns cold, enjoy Tandoori Chai at home. This recipe uses easily available ingredients and simple steps to create a flavorful, smoky tea perfect for winter. Enjoy a taste of tapri-style chai in minutes!
Web Summary : मौसम में ठंडक बढ़ने के साथ, घर पर तंदूरी चाय का आनंद लें। इस रेसिपी में आसानी से उपलब्ध सामग्री और सरल चरणों का उपयोग करके एक स्वादिष्ट, स्मोकी चाय बनाई जाती है जो सर्दियों के लिए एकदम सही है। मिनटों में टपरी-शैली की चाय का स्वाद लें!