Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > टपरीवर मिळतो तसा फक्कड मसाला चहा करा घरीच, पंकज त्रिपाठींनी शेअर केली खास ट्रिक, चहा होईल घट्ट

टपरीवर मिळतो तसा फक्कड मसाला चहा करा घरीच, पंकज त्रिपाठींनी शेअर केली खास ट्रिक, चहा होईल घट्ट

masala tea recipe: street style masala chai: tapri style chai at home: अगदी टपरीवर मिळणारा कडक मसाला चहा कसा करायचा पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2025 17:01 IST2025-12-19T16:55:45+5:302025-12-19T17:01:24+5:30

masala tea recipe: street style masala chai: tapri style chai at home: अगदी टपरीवर मिळणारा कडक मसाला चहा कसा करायचा पाहूया.

how to make tapri style masala chai at Home Pankaj Tripathi masala tea recipe street style strong chai recipe Indian kadak chai like roadside stall | टपरीवर मिळतो तसा फक्कड मसाला चहा करा घरीच, पंकज त्रिपाठींनी शेअर केली खास ट्रिक, चहा होईल घट्ट

टपरीवर मिळतो तसा फक्कड मसाला चहा करा घरीच, पंकज त्रिपाठींनी शेअर केली खास ट्रिक, चहा होईल घट्ट

चहा म्हटलं की अनेकांसाठी अमृतच. सकाळच्या दिवसाची सुरुवात, दुपारचा फ्री टाइम किंवा संध्याकाळी चहा हा हमखास प्यायला जातो. चहाशिवाय सगळं अपूर्ण वाटतं. बऱ्याच लोकांसाठी चहा म्हणजे फक्त एक पेय असतं, पण अनेक सेलिब्रिटींसाठी चहा ही दिवसाची सुरुवात, आठवणी आणि सवयींशी जोडलेला खास क्षण असतो.(masala tea recipe) कुणाला आल्याचा कडक चहा आवडतो, तर कुणी गुळाचा चहा पितो. शूटिंगच्या गडबडीत, प्रवासात किंवा थकलेल्या मनाला दिलासा देण्यासाठी चहा हा कलाकारांचा आवडता साथीदार आहे. काही सेलिब्रिटी तर चहाच्या कपाशिवाय दिवस सुरूच करत नाहीत. (street style masala chai)
अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे साधेपणासाठी ओळखला जाणारा अभिनेता पंकज त्रिपाठी. पुरस्कार, यश आणि प्रसिद्धी मिळूनही त्याच्या सवयी मात्र अजूनही अगदी साध्याशा.(Pankaj Tripathi chai) पंकज त्रिपाठी आपल्या दिवसाची सुरुवात एक कप चहाने करतात. अगदी टपरीवर मिळणारा कडक मसाला चहा कसा करायचा याविषयी त्यांनी सांगितलं. 

अचानक हात थरथरतात, डोळ्यांत पाणी - श्वास गुदमरतो? ४ उपाय - चलबिचल झालेलं मन येईल ताळ्यावर- ओव्हरथिंकिंगही थांबेल

बाजारात मिळणाऱ्या रेडिमेड चहा मसाल्यांपेक्षा घरच्या घरी थोडंसं आलं, वेलची, काळी मिरी यांचा वापर केल्यास चहा अधिक नैसर्गिक, गोड आणि चविष्ट होतो. चहा करताना गॅस फार मोठा न ठेवता मध्यम आचेवर चहा उकळवला तर दूध फाटत नाही आणि चहावर छान मलाई येते.

या चहामध्ये असणारे आले, वेलची, दालचिनी  आणि लवंगसारखे घटक शरीर आणि हृदयासाठी हिवाळ्यात उबदार ठरतात. जर आपल्यालाही दिवसभराचा थकवा घालवायचा असेल तर हा टपरीसारखा फक्कड मसालेदार चहा घरीच कसा करायचा पाहा. 

पंकज त्रिपाठी सांगतात मसाला चहा करण्यासाठी वेलची, लवंग, आले आणि काळी मिरी असते. पण यात तमालपत्र घातलं की चव आणखी वाढते. यात असणारे अँटीऑक्सिडंट्स पचन सुधारण्याचे काम करतात. तसेच यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते. 

मसालेदार चहा करण्यासाठी सगळ्यात आधी चहाच्या भांड्यात पाणी उकळवा. नंतर त्यात वेलची, लवंग आणि आले व्यवस्थित बारीक करुन घ्या. आता पाणी उकळल्यानंतर त्यात मसाले आणि तमालपत्र घाला. २ ते ३ मिनिटे उकळल्यानंतर त्यात चहापत्ती घाला. चहाला उकळी आल्यानंतर त्यात दूध आणि साखर घाला. चहा व्यवस्थित उकळल्यानंतर गाळून घ्या. तयार होईल टपरीसारखा मसाला चहा अगदी घरीच. 



Web Title : पंकज त्रिपाठी की ट्रिक से घर पर बनाएं टपरी जैसा मसाला चाय

Web Summary : अभिनेता पंकज त्रिपाठी ने घर पर टपरी जैसा मसाला चाय बनाने की विधि बताई। अदरक, इलायची और काली मिर्च जैसे मसालों का उपयोग चाय के स्वाद को बढ़ाता है और स्वास्थ्य लाभ प्रदान करता है, खासकर सर्दियों में। तेज पत्ता डालने से स्वाद और बढ़ जाता है।

Web Title : Make street-style masala chai at home with Pankaj Tripathi's trick.

Web Summary : Actor Pankaj Tripathi shares his recipe for making robust masala chai at home, just like you get at a tea stall. Using fresh spices like ginger, cardamom, and black pepper enhances the tea's flavor and offers health benefits, especially during winter. Adding bay leaf is his special touch.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.