उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच गृहिणींना वाळवणाचे, साठवणीचे पदार्थ बनवण्याच्या तयारीला लागतात. (How to make tandalache Kurkure) या हंगामात पापड, कुरड्या, सांडगे, शेवया आणि इतर अनेक सुकवणीचे पदार्थ आपण बनवतो. पापड वर्षभर टिकावे आणि नरम पडू नये यासाठी आपण अनेक नवीन पद्धतीने ते तयार करण्याचा प्रयत्न करतो. (how to make rice Kurkure at home)
उडदाच्या साबुदाण्याच्या पापडपेक्षा तांदळाचे पापड खायला अधिक चविष्ट आणि टेस्टी लागतात. (Homemade papad) पचायला हलके असल्यामुळे कोणता त्रासही होत नाही. वरण-भात, लोणच आणि पापड असं समीकरण असल्यावर ताटाची चव अधिक वाढते. उन्हाळा सुरु झाला असून तुम्हाला तांदळाचे पाप़ किंवा खुसखुशीत कुरकुरे बनवायचे असतील तरी चविष्ट रेसिपी नक्की ट्राय करुन पाहा.
Shiv Jayanti 2025: खास मराठमोळी परंपरा असलेली सांज्याची पोळी, मऊमुलायम गोड परफेक्ट
1. साहित्य
तांदूळ - १ वाटी
पाणी - दीड वाटी
चिली फ्लेक्स /ओरिगॅनो - चवीनुसार
पापडखार - चवीनुसार
मीठ - चवीनुसार
तेल - तळण्यासाठी
2. कृती
सर्वात आधी तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. एका भांड्यात दीड वाटी पाणी घेऊन त्यात धुतलेला तांदूळ ८ ते ९ तास भिजवत ठेवा.
त्यानंतर कुकरच्या भांड्यात ५ कप पाणी घाला त्यात चिली फ्लेक्स, ओरिगॅनो, पापड खार आणि मीठ घाला. पाण्यात चमचा घालून चांगले ढवळून घ्या.
यामध्ये भिजवलेले तांदूळ घालून पुन्हा ढवळून घ्या. मंद आचेवर कुकरची एक शिट्टी काढा. कुकर थोडा थंड झाल्यावर मिश्रण चांगले ढवळा.
प्लास्टिक किंवा कोन असणाऱ्या पिशवीत तयार सारण भरून उभ्या- आडव्या रेषा पाडून घ्या. कडकडीत उन्हात सुकवा.
हवं तेव्हा कडकडीत गरम तेलात तळा तांदळाचे खुसखुशीत कुरकुरे...