वातावरणात गारवा वाढला की आपल्याला ऋतुमानानुसार फळे किंवा भाज्या दिसू लागतात. पालक, मेथीसह गाजर, रताळ्यांची देखील मागणी मोठ्या प्रमाणात वाढते.(Sweet potato wafers) रताळू हे कंदमूळ त्याचा पौष्टिकपणा, चव आणि गुणांसाठी ओळखले जाते. आपण हे उकडून, भाजून खा, हलवा किंवा कटलेट म्हणून आपण खातोच. पण कधी रताळ्याचे वेफर्स ट्राय केले आहेत का? (Margashirsha fast recipes)केळी, बटाट्याचे वेफर्स आपण खाल्लेच असतील. पण रताळ्याचे वेफर्स हे हलके, पचायला सोपे आणि नैसर्गिक पद्धतीने गोड असतात.(Upvas recipe) रताळ्यातील नैसर्गिक फायबर, व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C, आणि पोटॅशियम हे घटक शरीराला ऊर्जा देतात, पचन सुधारतात आणि हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवतात. हे वेफर्स कसे बनवायचे पाहूया. (Quick fasting recipes)
पालकची भजी तेलकट-कडक होतात? सोपी ट्रिक- १० मिनिटांत होतील पालकची कुरकुरीत-खमंग भजी, सोपी रेसिपी
साहित्य
रताळे - ४ ते ५तेल - तळण्यासाठी मीठ - चवीनुसारसाखर - १ चमचा हळद - १ चमचा लाल तिखट - १ चमचा आमचूर पावडर - १ चमचा
कृती
1. सगळ्यात आधी रताळे दोन पाण्याने स्वच्छ धुवा. सुती कापडाच्या मदतीने रताळे पुसून घ्या. ज्यामुळे त्याच्या आतील पाणी निघेल. यानंतर त्याच्या मागाचा-पुढचा भाग चाकूने कापा. आता वेफर्सच्या किसणीने रताळ्याच्या चकत्या तयार करुन पाण्यात घाला.
2. तयार रताळ्याच्या चकत्या उन्हात काही काळ सुकवा. ज्यामुळे त्याच्या आतील पाणी निघेल. आता गॅसवर तेल तापवून चकत्या तळून घ्या.
3. तळलेले रताळ्याचे वेफर्स मिक्स करुन त्यात मीठ, साखर, हळद, लाल तिखट घाला. हवे असल्यास आमचूर पावडर देखील घालू शकता. पुन्हा एकदा सर्व मिक्स करु खा कुरकुरीत रताळ्याचे वेफर्स.
Web Summary : Enjoy sweet potato wafers during your fast! This easy recipe uses simple ingredients. Sweet potatoes are nutritious and provide energy, fiber, and vitamins. Fry the wafers and add spices for a delicious snack.
Web Summary : अपने व्रत के दौरान शकरकंद के वेफर्स का आनंद लें! यह आसान रेसिपी सरल सामग्री का उपयोग करती है। शकरकंद पौष्टिक होते हैं और ऊर्जा, फाइबर और विटामिन प्रदान करते हैं। वेफर्स को तलें और स्वादिष्ट नाश्ते के लिए मसाले डालें।