Join us
Daily Top 2Weekly Top 5

कवठाची आंबट-गोड चटणी, झटपट १० मिनिटांत करा, तोंडाला चव आणणारी चटकदार रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2026 10:44 IST

Kavath chutney recipe: Sweet and sour chutney: 10 minute chutney recipe: कवठाची चटणी कशी करायची पाहूया.

भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये चटणीला विशेष स्थान आहे.  जेवणाच्या ताटात डाव्या बाजूला वाढलेली चटणी संपूर्ण जेवणाची लज्जत वाढवण्याचे काम करते.(Kavath chutney recipe) गरमागरम वरण-भात किंवा भाकरीसोबत चटणी आवडीने खाल्ली जाते. हिवाळ्यात बाजरात अनेक फळ किंवा भाज्या दिसतात. कवठ देखील याच दिवसांत बाजारात येतात.(Sweet and sour chutney) त्यामुळे सध्या सगळीकडेच मुबलक प्रमाणात कवठं (kavath or wood apple) दिसत आहेत. एरवी वर्षभर हे फळ बघायलाही मिळत नाही. वर्षभरातून केवळ दिड ते दोन महिनेच उपलब्ध असणारं हे फळ अतिशय आरोग्यदायी आहे.(10 minute chutney recipe)लहानपणी शाळेच्या गेटबाहेर मिळणारे कवठाचे गोळे अनेकांनी खाल्ले असेलच. मिठात घोळवलेली ती आंबट चव आजही अनेकांच्या लक्षात असेल. पण हीच चव जेव्हा आपल्या स्वयंपाकघरात पारंपरिक चटणीच्या रूपात चाखायला मिळते, तेव्हा ती जेवणाची रंगत द्विगुणित करते. याची चटणी कशी बनवायची, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. 

Brain Fog : शरीर थकल्यासारखं वाटतं, हाता-पायात त्राणच उरला नाही? ताटातील ५ पदार्थ वाढवतात स्ट्रेस- मेंदूला कायमच करतात कमकुवत

कवठाची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य 

पिकलेले कवठ - १ मोठे गूळ - चवीनुसार लाल मिरची - ३ ते ४जिरे - १ चमचा मीठ - चवीनुसार लसूण पाकळ्या - ४ ते ५ 

कृती 

१. सगळ्यात आधी कवठ फोडून घ्या. एका बाऊलमध्ये त्याचा गर काढा. त्याच्या आत मोठे धागे असल्यास तेही काढून टाका. 

२. किसलेला गुळ, लाल तिखट, जिरे आणि चवीनुसार मीठ घाला. जर तुम्हाला लसणाची चव आवडत असेल, तर त्यात ४-५ लसूण पाकळ्या टाका.

३. आता हे सर्व मिश्रण पाटा-वरवंट्यावर किंवा मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. मिक्सर वापरत असाल तर पल्स मोडवर फिरवा, ज्यामुळे कवठाच्या बिया जास्त बारीक होणार नाहीत. 

४. अनेकांना ही चटणी कच्ची खायला आवडते. आपण हवं असल्यास वरून जिरे-मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देऊ शकता. वरण-भात किंवा भाकरीसोबत खा आंबट-गोड कवठाची चटणी.  

English
हिंदी सारांश
Web Title : Sweet and Sour Wood Apple Chutney: A Quick 10-Minute Recipe

Web Summary : Kavath chutney, made from wood apples, is a flavorful Indian condiment. This simple recipe uses wood apple pulp, jaggery, chili, cumin, salt, and garlic. Grind into a coarse paste and enjoy with flatbread or rice for a tangy, sweet taste.
टॅग्स :अन्नपाककृती