भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये चटणीला विशेष स्थान आहे. जेवणाच्या ताटात डाव्या बाजूला वाढलेली चटणी संपूर्ण जेवणाची लज्जत वाढवण्याचे काम करते.(Kavath chutney recipe) गरमागरम वरण-भात किंवा भाकरीसोबत चटणी आवडीने खाल्ली जाते. हिवाळ्यात बाजरात अनेक फळ किंवा भाज्या दिसतात. कवठ देखील याच दिवसांत बाजारात येतात.(Sweet and sour chutney) त्यामुळे सध्या सगळीकडेच मुबलक प्रमाणात कवठं (kavath or wood apple) दिसत आहेत. एरवी वर्षभर हे फळ बघायलाही मिळत नाही. वर्षभरातून केवळ दिड ते दोन महिनेच उपलब्ध असणारं हे फळ अतिशय आरोग्यदायी आहे.(10 minute chutney recipe)
लहानपणी शाळेच्या गेटबाहेर मिळणारे कवठाचे गोळे अनेकांनी खाल्ले असेलच. मिठात घोळवलेली ती आंबट चव आजही अनेकांच्या लक्षात असेल. पण हीच चव जेव्हा आपल्या स्वयंपाकघरात पारंपरिक चटणीच्या रूपात चाखायला मिळते, तेव्हा ती जेवणाची रंगत द्विगुणित करते. याची चटणी कशी बनवायची, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.
कवठाची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
पिकलेले कवठ - १ मोठे
गूळ - चवीनुसार
लाल मिरची - ३ ते ४
जिरे - १ चमचा
मीठ - चवीनुसार
लसूण पाकळ्या - ४ ते ५
कृती
१. सगळ्यात आधी कवठ फोडून घ्या. एका बाऊलमध्ये त्याचा गर काढा. त्याच्या आत मोठे धागे असल्यास तेही काढून टाका.
२. किसलेला गुळ, लाल तिखट, जिरे आणि चवीनुसार मीठ घाला. जर तुम्हाला लसणाची चव आवडत असेल, तर त्यात ४-५ लसूण पाकळ्या टाका.
३. आता हे सर्व मिश्रण पाटा-वरवंट्यावर किंवा मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. मिक्सर वापरत असाल तर पल्स मोडवर फिरवा, ज्यामुळे कवठाच्या बिया जास्त बारीक होणार नाहीत.
४. अनेकांना ही चटणी कच्ची खायला आवडते. आपण हवं असल्यास वरून जिरे-मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देऊ शकता. वरण-भात किंवा भाकरीसोबत खा आंबट-गोड कवठाची चटणी.
