आज काय बनवलं, तर सुरणची भाजी. असं म्हटलं की मुलं काय, मोठेही नाक मुरडतात. सुरणाची भाजी अनेकांना आवडत नाही आणि ती बनवताना हाताला खाज सुटणे किंवा खाल्ल्यानंतर घशात खवखव सुरु होते. त्यामुळे या पौष्टिक भाजीकडे कायम दुर्लक्ष केलं जातं.(suran chips recipe) सुरण ही पारंपरिक भाजी असली तरी तिचा वापर अनेक घरांत कमी झाला आहे. सुरण पचनासाठी उपयुक्त, ऊर्जा देणारा आणि शरीराला उब देणारा घटक मानला जातो. योग्य पद्धतीने केला, तर सुरण खाजही देत नाही आणि चवीला अप्रतिम लागतो.(crispy chips recipe)घरात सुरणाची भाजी खात नसतील तर एकदा सुरणाचे कुरकुरीत चिप्स बनवून खाऊ घाला. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ, चवीला अगदी बटाटा भजीसारखे लागणारे हे चिप्स चहासोबत खायला एकदम परफेक्ट असतात.सुरणाचे वेफर्स बटाटा चिप्सपेक्षाही जास्त कुरकुरीत आणि चविष्ट लागतात. सुरणाची भाजी नाही, तर चहासोबत खाण्यासाठी 'सुरणाचे कुरकुरीत चिप्स' कसे बनवायचे याची सोपी रेसिपी पाहूया. (tea time snacks)
साहित्य
सुरण - पाव किलोमीठ - चवीनुसार पेरी पेरी मसाला - चवीनुसार तेल - तळण्यासाठी व्हिनेगर पाणी
कृती
1. सगळ्यात आधी एका पातेल्यामध्ये पाणी घालून त्यात मीठ आणि चमचाभर व्हिनेगर घाला. आता सुरणाचे कापून घेऊन त्याचे वरचे साल काढा. त्याचे चौकनी आकारात तुकडे करुन वेफर्स मशिनमध्ये पातळ चकत्या करा.
2. सुरणाच्या चकत्या धुवून घ्या. नंतर उकळत्या मीठ-व्हिनेगरच्या पाण्यात ३ ते ४ मिनिटे उकळवा. चकत्या बाहेर काढून टिशू पेपर किंवा रुमालात पसरवा. ज्यामुळे यातील सर्व पाणी निघून जाईल.
3. कढईत तेल मंद आचेवर तापवून घ्या. नंतर तयार चकत्या फास्ट गॅसवर तळून घ्या. कुरकुरीत झाल्यानंतर ताटात काढा.
4. चिप्सवर वरुन मीठ आणि पेरी पेरी मसाला घाला. सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करुन घ्या. चहासोबत खा कुरकुरीत सुरणाचे चिप्स.
Web Summary : Transform yam, often disliked, into crispy chips! This simple recipe creates a tasty, tea-time snack, offering a unique alternative to potato chips. Enjoy these crunchy, flavorful yam chips with your evening tea.
Web Summary : सुरण को, जिसे अक्सर नापसंद किया जाता है, कुरकुरे चिप्स में बदलें! यह आसान रेसिपी एक स्वादिष्ट, चाय के समय का नाश्ता बनाती है, जो आलू के चिप्स का एक अनूठा विकल्प है। अपनी शाम की चाय के साथ इन कुरकुरे, स्वादिष्ट सुरण चिप्स का आनंद लें।