Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > चहासोबत खा 'सुरणाचे चिप्स'; पाहा रेसिपी - सुरण म्हणताच पळणारे खातील चारवेळा मागून..

चहासोबत खा 'सुरणाचे चिप्स'; पाहा रेसिपी - सुरण म्हणताच पळणारे खातील चारवेळा मागून..

suran chips recipe: crispy chips recipe: tea time snacks: सुरणाचे कुरकुरीत चिप्स कसे बनवायचे पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2026 09:30 IST2026-02-02T09:30:00+5:302026-02-02T09:30:03+5:30

suran chips recipe: crispy chips recipe: tea time snacks: सुरणाचे कुरकुरीत चिप्स कसे बनवायचे पाहूया.

how to make suran chips at home easy suran chips for tea time homemade suran chips step by step suran fry that doesn’t cause itching crispy suran chips | चहासोबत खा 'सुरणाचे चिप्स'; पाहा रेसिपी - सुरण म्हणताच पळणारे खातील चारवेळा मागून..

चहासोबत खा 'सुरणाचे चिप्स'; पाहा रेसिपी - सुरण म्हणताच पळणारे खातील चारवेळा मागून..

आज काय बनवलं, तर सुरणची भाजी. असं म्हटलं की मुलं काय, मोठेही नाक मुरडतात. सुरणाची भाजी अनेकांना आवडत नाही आणि ती बनवताना हाताला खाज सुटणे किंवा खाल्ल्यानंतर घशात खवखव सुरु होते. त्यामुळे या पौष्टिक भाजीकडे कायम दुर्लक्ष केलं जातं.(suran chips recipe)  सुरण ही पारंपरिक भाजी असली तरी तिचा वापर अनेक घरांत कमी झाला आहे. सुरण पचनासाठी उपयुक्त, ऊर्जा देणारा आणि शरीराला उब देणारा घटक मानला जातो. योग्य पद्धतीने केला, तर सुरण खाजही देत नाही आणि चवीला अप्रतिम लागतो.(crispy chips recipe)
घरात सुरणाची भाजी खात नसतील तर एकदा सुरणाचे कुरकुरीत चिप्स बनवून खाऊ घाला. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ, चवीला अगदी बटाटा भजीसारखे लागणारे हे चिप्स चहासोबत खायला एकदम परफेक्ट असतात.सुरणाचे वेफर्स बटाटा चिप्सपेक्षाही जास्त कुरकुरीत आणि चविष्ट लागतात. सुरणाची भाजी नाही, तर चहासोबत खाण्यासाठी 'सुरणाचे कुरकुरीत चिप्स' कसे बनवायचे याची सोपी रेसिपी पाहूया. (tea time snacks)

चमचमीत आणि कुरकुरीत भोपळ्याच्या पानांची भजी! ऐकला नसेल तुम्ही हा पदार्थ, कांदा भजीच्या तोडीसतोड चव, पाहा रेसिपी

साहित्य 

सुरण - पाव किलो
मीठ - चवीनुसार 
पेरी पेरी मसाला - चवीनुसार 
तेल - तळण्यासाठी 
व्हिनेगर 
पाणी 


कृती 

1. सगळ्यात आधी एका पातेल्यामध्ये पाणी घालून त्यात मीठ आणि चमचाभर व्हिनेगर घाला. आता सुरणाचे कापून घेऊन त्याचे वरचे साल काढा. त्याचे चौकनी आकारात तुकडे करुन वेफर्स मशिनमध्ये पातळ चकत्या करा. 

2. सुरणाच्या चकत्या धुवून घ्या. नंतर उकळत्या मीठ-व्हिनेगरच्या पाण्यात ३ ते ४ मिनिटे उकळवा. चकत्या बाहेर काढून टिशू पेपर किंवा रुमालात पसरवा. ज्यामुळे यातील सर्व पाणी निघून जाईल. 

3. कढईत तेल मंद आचेवर तापवून घ्या. नंतर तयार चकत्या फास्ट गॅसवर तळून घ्या. कुरकुरीत झाल्यानंतर ताटात काढा. 

4. चिप्सवर वरुन मीठ आणि पेरी पेरी मसाला घाला. सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करुन घ्या. चहासोबत खा कुरकुरीत सुरणाचे चिप्स. 


Web Title : शाम की चाय के साथ स्वादिष्ट नाश्ता: सुरण चिप्स रेसिपी

Web Summary : सुरण को, जिसे अक्सर नापसंद किया जाता है, कुरकुरे चिप्स में बदलें! यह आसान रेसिपी एक स्वादिष्ट, चाय के समय का नाश्ता बनाती है, जो आलू के चिप्स का एक अनूठा विकल्प है। अपनी शाम की चाय के साथ इन कुरकुरे, स्वादिष्ट सुरण चिप्स का आनंद लें।

Web Title : Yam Chips Recipe: A Delicious Snack with Evening Tea

Web Summary : Transform yam, often disliked, into crispy chips! This simple recipe creates a tasty, tea-time snack, offering a unique alternative to potato chips. Enjoy these crunchy, flavorful yam chips with your evening tea.