Join us

साखर-मैदा न वापरता घरीच बनवा ओट्स खजूर केक, करायला अगदी सोपा आणि मऊमुलायम स्पाँजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2025 16:23 IST

Healthy Oats and Dates Cake Recipe: Oats and Dates Cake for Weight Loss: Sugar-Free Oats and Dates Cake: Easy Oats and Dates Cake Recipe: Nutritious Oats and Dates Cake for Energy: Vegan Oats and Dates Cake Recipe: sugar free cake: ओट्स आणि खजूरपासून बनवा केक

केक म्हटलं की, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. अगदी  लहानांपासून-मोठ्यांपर्यंत अनेकांना आवडणारा पदार्थ. (Healthy Oats and Dates Cake Recipe) यामध्ये मैदा, साखर टाकल्यामुळे अनेकजण केक खाण्याचा मोह टाळतात. मैदा आणि साखरेमुळे वजन वाढण्यासह रक्तातील साखरेचे प्रमाण देखील वाढते. यामुळे अनेक आजारांना तोंड द्यावं लागतं. ( Oats and Dates Cake for Weight Loss)

साधारणत: केक आपल्या घरी हा कुणाच्या तरी वाढदिवसानिमित्तच घरी येतो. (Easy Oats and Dates Cake Recipe) परंतु तुम्हाला घरच्या घरी केक बनवायचा असेल तर शुगर फ्री केक ट्राय करुन पाहू शकता. (Sugar-Free Oats and Dates Cake) यामुळे रक्तातील साखर वाढणार नाही, ना वजन वाढण्याचा धोका राहिल. ओट्स आणि खजूर शरीरासाठी हेल्दी पदार्थ आहे. यापासून बनवलेले पदार्थ खाल्ल्याने आरोग्य निरोगी राहाते. मऊ आणि स्पाँजी केक घरीच कसा बनवायचा पाहूया रेसिपी. 

उन्हाळ्यात बनवा वर्षभर टिकणारे खुसखुशीत तांदळाचे कुरकुरे, टेस्टी आणि चटपटीत

साहित्य ओट्स - १ १/४ कप गरम दूध - १ कप खजूर - ७ ते ८ पिकलेली केळी - १ ते २कोको पावडर - १/४ कप बेकिंग पावडर - १  चमचा

कृती केक बनवण्यासाठी सर्वात आधी खजूरच्या बिया काढून घ्या. नंतर एका वाटीत घेऊन गरम दूध घाला. खजूर वितळल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून पातळ पेस्ट तयार करा. एका वाटीत पिकलेली केळी घेऊन त्याला चांगले कुस्करुन घ्या. यामध्ये ओट्सचा पावडर, कोको पावडर आणि तयार खजूरची पेस्ट घाला. मिश्रण एकजीव करुन वरुन १ चमचा बेकिंग पावडर घाला. तयार मिश्रण चांगले फेटून घ्या. वरुन आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालून बेक करुन घ्या. तयार होईल मऊ आणि स्पाँजी ओट्स-खजूर केक... 

 

टॅग्स :पाककृतीअन्न