Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > डब्यासाठी ‘अशी’ करा भरलेली ढोबळी मिरची, रेसिपी झटपट-चव जबरदस्त-स्टफ्ड फ्राय मिरची

डब्यासाठी ‘अशी’ करा भरलेली ढोबळी मिरची, रेसिपी झटपट-चव जबरदस्त-स्टफ्ड फ्राय मिरची

Stuffed capsicum recipe: Bharli dhobli mirchi recipe: Quick tiffin recipes Marathi : भरलेली ढोबळी मिरची कशी बनवायची, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2025 11:37 IST2025-11-06T11:36:19+5:302025-11-06T11:37:06+5:30

Stuffed capsicum recipe: Bharli dhobli mirchi recipe: Quick tiffin recipes Marathi : भरलेली ढोबळी मिरची कशी बनवायची, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.

How to make stuffed Shimla mirchi Maharashtrian style Quick and easy bharli dhobli mirchi recipe for lunchbox Traditional Marathi stuffed capsicum fry recipe | डब्यासाठी ‘अशी’ करा भरलेली ढोबळी मिरची, रेसिपी झटपट-चव जबरदस्त-स्टफ्ड फ्राय मिरची

डब्यासाठी ‘अशी’ करा भरलेली ढोबळी मिरची, रेसिपी झटपट-चव जबरदस्त-स्टफ्ड फ्राय मिरची

रोज डब्यात काय न्यावं हा प्रश्न रोज गृहिणींसमोर असतो. काहीतरी झटपट, चविष्ट आणि पौष्टिक खाण्याची इच्छा होत असते.(Lunchbox recipes Indian) मुलांना बाहेरची खाण्याच्या सवय लागली की, ते घरातील जेवण खाण्यास नाक मुरडतात. त्यात पोळी-भाजी ही मुलांची ना आवडती. कितीही मारुन, गोड बोलून खायला घातलं तरी त्याचं नाटक असतं.(Healthy lunchbox ideas) त्यांना पालेभाज्या, फळभाज्या आवडत नाही. बाहेरच्या पदार्थांची जिभेला इतकी चटक लागलेली असते की त्यांना घरचं अन्न नको असतं.(Quick tiffin recipes Marathi) हे फक्त मुलांच्या बाबतीत नाही तर मोठ्यांच्या बाबतीतही असंच असते. काही भाज्या या त्यांच्या नावडीच्या. पण काही भाज्यांना स्टफ्ड करुन बनवलं तर त्या चवीला अगदी उत्तम लागतात. त्यातील एक ढोबळी मिरची. (Bharli dhobli mirchi recipe)
या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असते.(Stuffed bell pepper fry) यात आपण बटाटा किंवा शेंगदाण्याचे मिश्रण घालून बनवू शकतो.(Stuffed capsicum recipe) ही रेसिपी अगदी १५ ते २० मिनिटांमध्ये बनते. भरलेली ढोबळी मिरची कशी बनवायची, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. (Indian vegetarian stuffed pepper recipe)

नथीचा नखरा! लग्नसराईत काठपदराच्या साडीवर हवाच नथीचा ठसठसशीत आकडा, पाहा सुंदर डिझाइन्स - पारंपरिक आणि मॉडर्न

साहित्य 

ढोबळी मिरची - ५ ते ६ 
सुके खोबरे - १ वाटी 
शेंगदाणे - १ वाटी 
हिरव्या मिरच्या - ३ 
लसूण पाकळ्या - ४ ते ५
आले - १ तुकडा 
जिरे - १ चमचा
मीठ - चवीनुसार 
लाल मसाला - १ चमचा 
लिंबू - अर्धा चमचा रस 
साखर - १ चमचा 
तेल - आवश्यकतेनुसार 

कृती 

1. सगळ्यात आधी आपल्याला ढोबळी मिरची पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी लागेल. त्यानंतर वरचे देठ काढून त्यातील बिया काढून घ्या. आता किसणीवर सुके खोबरे किसून घ्या. 

2. गॅसवर तवा ठेवून त्यावर शेंगदाणे भाजून घ्या. नंतर त्यात हिरव्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या देखील भाजून एका ताटात काढा. आता आलं तव्यावर व्यवस्थित भाजा. त्यात सुक्या खोबऱ्याचा किस घालून तोही छान परतवून घ्या. 

मेदूवडा तळताना फुटतो- वातड-कडक होतो? ५ टिप्स, घरच्याघरी होईल अण्णाकडे मिळतो तसा परफेक्ट वडा

3. भाजलेल्या सर्व साहित्यात जिरे, मीठ, लाल तिखट, लिंबाचा रस आणि साखर घाला. सर्व साहित्य एकत्र करुन मिक्सरमध्ये वाटून घ्या. 

4. आता मिक्समध्ये वाटलेलं मिश्रण ढोबळी मिरचीमध्ये भरा. गॅस पुन्हा सुरु करुन त्यावर कढई ठेवा. थोडे तेल घालून भरलेली ढोबळी मिरची त्यावर पसरवा. वरुन मीठ घालून ताट झाकूण ठेवा. मंद आचेवर भाजी शिजू द्या. 

५ ते १० मिनिटांनी ढोबळी मिरची वरखाली करुन दुसऱ्या बाजूने व्यवस्थित शिजवून घ्या. तयार होईल स्टफ्ड फ्राय ढोबळी मिरची. 

 


Web Title : भरवां शिमला मिर्च रेसिपी: झटपट, स्वादिष्ट, और लंचबॉक्स के लिए उत्तम

Web Summary : भरवां शिमला मिर्च एक पौष्टिक और स्वादिष्ट लंचबॉक्स विकल्प है। यह रेसिपी, मिनटों में तैयार, नारियल, मूंगफली और मसालों के स्वादिष्ट मिश्रण के साथ शिमला मिर्च को जोड़ती है। बच्चों को सब्जियां खिलाने का शानदार तरीका।

Web Title : Stuffed Capsicum Recipe: Quick, Delicious, and Perfect for Lunchboxes

Web Summary : Stuffed capsicum is a nutritious and tasty lunchbox option. This recipe, ready in minutes, combines capsicum with a flavorful filling of coconut, peanuts, and spices. A great way to make children enjoy vegetables.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.