Join us

गिलक्याची भाजी आवडत नाही? 'या' पद्धतीने करा भरली गिलकी, झणझणीत मसाला रेसिपी झटपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2025 09:30 IST

Stuffed Gilka Bhaji recipe : Stuffed Gilka Bhaji: Quick ridge gourd dish: सकाळच्या डब्यासाठी हा पर्याय चांगला आहे.

आपल्यापैकी अनेकांना गिलक्याचं नाव जरी काढलं तरी नाक मुरडण्यास सुरुवात होते.(Stuffed Gilka Bhaji recipe) कारण गिलकी म्हटलं की डोळ्यासमोर बेचव भाजी उभी राहते.(Stuffed Gilka Bhaji) लहानपणी आई-वडील जबरदस्तीने गिलकी घ्यायला लावत असत आणि आपण मात्र तोंड वाकडं करत होतो.(Quick ridge gourd dish) पण खरं सांगायचं तर गिलक्याची ही भाजी जितकी साधी दिसते तितकीच पौष्टिक आहे.(Spicy ridge gourd curry) साध्या गिलक्याची भाजी अनेकांना फारशी आवडत नाही.(Traditional Indian ridge gourd recipe with twist) पण  गिलक्याची जर थोड्या वेगळ्या पद्धतीने, भरून केलेली मसालेदार भाजी केली. तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील.(Healthy and delicious stuffed ridge gourd curry at home) आपण ही भाजी एकदम चमचमीत करुन खाऊ शकतो. पाहूया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती. 

तांदळाच्या उरलेल्या उकडपासून करा कोकणातला पारंपरिक पदार्थ दूध गोळे, चवीलाही जबरदस्त- बाप्पासाठी खास नैवेद्य

साहित्य गिलकी - २शेंगदाणे - १ वाटी जिरे - २ चमचे धने - २ चमचे लसूण पाकळ्या - ७ ते ८गरम मसाला - १ चमचा धणे पावडर - १ चमचाकाळा मसाला - १ चमचा मीठ - चवीनुसार कोथिंबीर - आवश्यकतेनुसारहळद - १ चमचा लाल तिखट - १ चमचातेल - २ चमचे मोहरी - १ चमचा 

पुरी-भजी, समोसे खाल्ले तरी वाढणार नाही कोलेस्टेरॉल! 'या' तेलात तळा, तब्येत राहील एकदम फिट

कृती 

1. सगळ्यात आधी गिलकी धुवून त्याचे वरचे साल काढून घ्या. आता याला मध्यभागी कट करुन त्याचा आतला गर काढा. यानंतर मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे, जिरे, धने आणि लसूण पाकळ्या घालून मसाला तयार करा. 

2. तयार मसाल्यामध्ये गरम मसाला, धणे पावडर, काळा मसाला, मीठ, कोथिंबीर, हळद, लाल तिखट घालून मसाला एकजीव करा. गिलक्यामध्ये मसाला भरून घ्या. त्याचे 

3. आता एका कढईत तेल तापवून घ्या. यामध्ये जिरे आणि मोहरी तडतडू द्या. आता त्यात भरली गिलकी घालून तेलावर परतवून घ्या. झाकण झाकून चांगले शिजू द्या. वरुन कोथिंबीर घाला, तयार होईल भरली गिलकी. 

टॅग्स :अन्नपाककृती