Lokmat Sakhi >Food > १० मिनिटांत होईल मऊ-जाळीदार पालक इडली, सोपी पद्धत पाहा- मुले खातील आवडीने

१० मिनिटांत होईल मऊ-जाळीदार पालक इडली, सोपी पद्धत पाहा- मुले खातील आवडीने

Spinach idli: Healthy idli recipe: Quick idli recipe: Kids favorite breakfast: पाहूया १० मिनिटांत झटपट होणारी पालक इडलीची रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2025 15:57 IST2025-09-14T15:56:25+5:302025-09-14T15:57:03+5:30

Spinach idli: Healthy idli recipe: Quick idli recipe: Kids favorite breakfast: पाहूया १० मिनिटांत झटपट होणारी पालक इडलीची रेसिपी.

How to make spinach idli in 10 minutes Soft and fluffy spinach idli recipe step by step Healthy breakfast idea for kids | १० मिनिटांत होईल मऊ-जाळीदार पालक इडली, सोपी पद्धत पाहा- मुले खातील आवडीने

१० मिनिटांत होईल मऊ-जाळीदार पालक इडली, सोपी पद्धत पाहा- मुले खातील आवडीने

सकाळचा नाश्ता म्हटलं की, सगळ्यात आधी डोळ्यासमोर येते ती इडली. चवीला मस्त आणि लवकर पचणारा पदार्थ. साऊथ इंडियन नाश्ता, जो हलका, पौष्टिक आणि पचायला अगदी सोपा असतो.(Morning Breakfast Idea) पण आजकाल लोकांना नेहमीच्या साध्या इडलीपेक्षा काहीतरी हटके आणि हेल्दी खावसं वाटतं. त्यासाठी इडली हा पदार्थ उत्तम पर्याय ठरतो.(breakfast idea for kids)  पण या इडलील आणखी हेल्दी करण्यासाठी आपण त्यात पालक किंवा इतर हिरव्या भाज्या घालून त्याची चव बदलू शकतो.(Spinach idli)  हिरव्या रंगाची ही इडली फक्त बघायला आकर्षक नाही तर भरपूर व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि आयर्नयुक्त असते.( Healthy idli recipe)
पालकमुळे शरीराला ऊर्जा मिळते. रक्तातील हिमोग्लोबिन वाढतं आणि पचनक्रिया देखील सुधारते. डब्यात किंवा नाश्त्यात देण्यासाठी ही इडली एकदम परफेक्ट आहे.(Quick idli recipe) साध्या इडलीच्या बॅटरमध्ये किंवा पीठ न आंबवता  पालक घालून केलेली ही हेल्दी डिश खाल्ल्यावर मुलांना हिरव्या भाज्यांचा तिटकाराही कमी होतो. पाहूया १० मिनिटांत  झटपट होणारी पालक इडलीची रेसिपी. 

ढोकळा हलका होऊन भरपूर फुगण्यासाठी ५ टिप्स, करा परफेक्ट स्पॉँजी ढोकळा एकदम पटकन

साहित्य 
रवा - १ कप
पालकाची पाने - १ कप (प्युरी)
आले - १ छोटा तुकडा (किसलेले)
हिरवी मिरची - १ (बारीक चिरलेली)
मीठ - चवीनुसार
तेल - तळण्यासाठी
कांदा - बारीक चिरलेला
दही - १ कप
इनो - अर्धा चमचा


कृती 

1. सगळ्यात आधी पालक नीट स्वच्छ करुन धुवून घ्या. त्याची पाने पाण्यात थोड्या प्रमाणात उकळून घ्या. थंड झाल्यानंतर ब्लेंडरमध्ये याची प्युरी तयार करा. आता एका भांड्यात रवा आणि दही घालून चांगले मिक्स करा. हे पीठ झाकून १५ ते २० मिनिटे ठेवा. ज्यामुळे रवा फुगेल. 

2. आता यात पालक प्युरी घाला आणि चांगले मिसळा. तसेच बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि किसलेले आले घाला. यात आपण गाजर किंवा इतर भाज्या देखील किसून घालू शकतो. तयार पीठात मीठ घालून मिक्स करा. नंतर थोडे पाणी घालून इडलीच्या पिठासारखे बॅटर तयार करा. इनो घालून चांगले फेटून घ्या.

3. इडली स्टँडला तेल लावून घ्या. आणि तयार बॅटर इडली पात्रात घाला. १२ ते १५ मिनिटे नीट शिजवा. थंड झाल्यानंतर चाकूच्या सहाय्याने इडली काढा. नारळाची चटणी किंवा सांबारसोबत खा. 

Web Title: How to make spinach idli in 10 minutes Soft and fluffy spinach idli recipe step by step Healthy breakfast idea for kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.