Join us

कडू कारल्याचा झणझणीत ठेचा! सोपी आणि चविष्ट रेसिपी, भाकरी- वरणभातासोबत लागेल मस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2025 16:06 IST

Karela chutney recipe: Bitter gourd thecha: Spicy karela recipe: कारल्याचा ठेचा कसा बनवायचा पाहूया.

ठेचा म्हटलं की आपल्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही.(Karela chutney recipe) लसणाचा, मिरचीचा, शेंगदाण्याचा ठेचा असे कितीतरी प्रकार आपण चाखले असतील. चवीला वेगळे पण आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा.(Bitter gourd thecha) झणझणीत ठेचा आणि त्यासोबत भाकरी किंवा गरमागरम वरणभात.(Spicy karela recipe) जेवणात वरणभात किंवा भाकरी, चपातीसोबत चटण्या किंवा ठेचा असला तर बात काही वेगळीच. आपण आतापर्यंत विविध पदार्थांच्या ठेच्याची चव चाखली असेलच पण कधी कडू कारल्याचा झणझणीत ठेचा खाल्ला आहे का? (Maharashtrian thecha)कारलं हे आपल्या शरीरासाठी औषधी गुणांनी भरलेलं आहे.(Karela side dish) कडू कारल्याचा ठेचा हा फक्त चवीला नाही तर आहारातल्या संतुलनासाठीही महत्त्वाचा आहे.(Karela fry chutney) चपाती, भाकरी किंवा वरणभातासोबत आवडीने खाल्ला जातो. कारल्याचा ठेचा कसा बनवायचा पाहूया. 

डब्यासाठी ‘अशी’ करा भरलेली ढोबळी मिरची, रेसिपी झटपट-चव जबरदस्त-स्टफ्ड फ्राय मिरची

साहित्य 

कारली - २ ते ३ मीठ - आवश्यकतेनुसार तेल - आवश्यकतेनुसार शेंगदाणे - १ कप लसूण पाकळ्या - १२ ते १५हिरव्या मिरच्या - ४ ते ५कढीपत्ता - ७ ते ८ पानंजिरे - १ चमचा लिंबाचा रस 

कृती 

1. सगळ्यात आधी कारली व्यवस्थित धुवून घ्या. आता सुरीच्या मदतीने गोल आकारात कापून घ्या. नंतर गोल आकारातील कारल्यामधली बिया आणि पांढरा भाग काढा. 

2. यानंतर एका भांड्यात कारली आणि मीठ घालून चांगले चोळून घ्या. ज्यामुळे यातील कडूपणा निघून जाईल. आता तव्यावर तेल गरम करुन त्यावर कारले फ्राय करुन ताटात काढा. 3. त्याच तव्यावर शेंगदाणे, लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि जिरे घालून परतवून घ्या. सर्व साहित्य ताटात काढून घ्या. वरुन लिंबाचा रस पिळा. आता पाट्यावर कारल्याचे साहित्य वाटून घ्या आणि त्याचा गोळा बनवा. भाकरी, चपाती किंवा वरण-भातासोबत खा. कडू कारल्याचा झणझणीत ठेचा. 

English
हिंदी सारांश
Web Title : Spicy Bitter Gourd Chutney: Easy, tasty recipe for bhakri and varanbhat.

Web Summary : Make spicy and healthy bitter gourd chutney, a unique Maharashtrian dish. This recipe balances taste and health, perfect with bhakri, chapati, or varanbhat. Learn how to easily prepare this flavorful side dish.
टॅग्स :अन्नपाककृती