Join us

सोमवारी डब्याला कुठली भाजी? भरली ढोबळी मिरची, रेसिपी झटपट-चव झणझणीत, आठवडा जाईल मस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2025 15:13 IST

Tiffin box recipe: dhobali mirchi recipe: bharleli dhobali mirchi: Protein rich tiffin idea: lunch box ideas: recipe: how to make bharleli dhobali mirchi: food: गावराण पद्धतीची भरलेली ढोबळी मिरचीची रेसिपी पाहा

आज डब्यासाठी काय बनवावं असा प्रश्न रोजच गृहिणींना पडतो. मुलांना रोज टिफिनमध्ये पौष्टिक आणि हेल्दी काय देता येईलं बरं... मुलांना बाहेरचे पदार्थ खाण्याची सवय लागली की, ते घरातले जेवण खाण्यास नाक मुरडतात. (lunch box ideas) त्यांना पालेभाज्या, फळभाज्या हा प्रकार मुळीच आवडतं नाही. बाहेरचे पदार्थ खाऊ घालणं किंवा पर्याय म्हणू बिस्किटे देणं हे त्यांच्या वाढीसाठी चांगले नाही. हाच प्रकार अनेकदा मोठ्यांसोबतही लागू होतो. (Tiffin box recipe) नवऱ्याला किंवा मुलांना अमुक-अमुक भाजी आवडतं नाही म्हणून घरात ती बनवली जात नाही. (bharleli dhobali mirchi)

ढोबळी मिरचीला पाहताच घरातले नाक मुरडू लागतात. भरलेले वांग, भरलेली भेंडी हे पदार्थ यापूर्वी आपण चवीन चाखलेच असेल. परंतु, आज आम्ही तुम्हाला गावराण पद्धतीची भरलेली ढोबळी मिरचीची रेसिपी सांगणार आहोत. करायला एकदम सोपी आणि पटकन बनणारी रेसिपी आहे. मग नक्की ट्राय करुन पाहा. 

साखर-मैदा न वापरता घरीच बनवा ओट्स खजूर केक, करायला अगदी सोपा आणि मऊमुलायम स्पाँजी

साहित्य ढोबळी मिरची  - पाव किलोसुक खोबर - २ इंच कोथिंबीर लसूण पाकळ्या -  10 ते 15भाजलेले शेंगदाण्याचा कुट- अर्धी वाटी जिरे पूड - 1/2 चमचा धणे पूड- 1/2 चमचामिरची पावडर- 1 चमचा कांदा लसूण मसाला - २ चमचे हळद- पाव चमचा मीठ चवीनुसारतेल- २ चमचेलाल मिरची पावडर - १ चमचा मोहरीजिरे हिंगकढीपत्ता

 

कृती 1. सर्वात आधी ढोबळी मिरचीला भरलेल्या वांग्यासारखे अर्धे चिरुन घ्या. त्यानंतर पाण्यामध्ये त्याला काही वेळ ठेवा. यामुळे त्याचा उग्र वास येणार नाही. 

2. मसाला तयार करण्यासाठी सुक खोबर, लसूण पाकळ्या आणि कोथिंबीरची जाडसर पेस्ट तयार करा. 

3. त्यानंतर एका ताटात दाण्याचा कूट, वाटलेल वाटण, जिरे-धणे पूड, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, मीठ, हळद आणि चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करा. 

4. मिश्रणात वरुन तेल घालून पुन्हा चांगले एकजीव करा. मसाला तयार होईल. 

5. आता मिरच्यांमधील पाणी काढून घ्या, त्यात तयार मसाला भरा. 

6. गॅसवर कढई तापत ठेवून त्यात तेल कडकडीत गरम करा. त्यात मोहरी, जिरे, हिंग, चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता आणि उरलेला मसाला त्यात घाला.

7. मंद आचेवर मसाला छान परतून घ्या.अर्धा कप पाणी घालून मसाला परतून घ्या. त्यानंतर मिरच्या घालून परतून घ्या. वरुन मीठ आणि कोथिंबीर घाला. 

8. त्यात कपभर पाणी घालून ७ ते ८ मिनिटे मंद आचेवर शिजवा. भाकरी किंवा भातासोबत खा झणझणीत गावराण पद्धतीची भरलेली ढोबळी मिरची. 

टॅग्स :अन्नपाककृती