सकाळच्या नाश्त्याला अनेक घरांमध्ये ढोकळा आवडीने खाल्ला जातो. मऊ, स्पाँजी ढोकळा अनेकांना आवडतो खरा पण बरेचदा तो घशात अडकतो म्हणून अनेकजण खाणे टाळतात.(green peas dhokla) न्यूट्रिशनिस्ट किंवा डाएट करणारे लोक ढोकळा आपल्या आहारात कायम खातात. पण सध्या वाढत्या वजनामुळे अनेकांचा कल हेल्दी खाण्याकडे वळत असला तरी पदार्थ फक्त पौष्टिक असणं पुरेसं नाही, तर पदार्थ चवीला देखील जबरदस्त हवा, अशी प्रत्येकाची इच्छा असते.( matar dhokla recipe) अशा वेळी “हेल्दी भी टेस्टी भी” हा टॅग अगदी योग्य ठरतो तो म्हणजे स्पाँजी-जाळीदार मटार ढोकळा.
हिवाळा आला की बाजारात हिरव्या मटारची बागच सगळीकडे पाहायला मिळते. मटारची भाजी, थेपले, पराठा, कचोरी, आमटी असे विविध पदार्थ आपल्याला चाखायला मिळतात.(healthy dhokla recipe) पण कधी मटारचा ढोकळा खाल्ला आहे का?. जिम करणारे, वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे किंवा लहान मुलांसाठी काही तरी हेल्दी द्यायचं असेल, तर मटार ढोकळा हा उत्तम पर्याय ठरतो. यात तेलाचा वापर कमी असल्याने तो हलका आणि सहज पचणारा असतो. अनेकदा ढोकळा करताना तो कडक होतो, कधी फुलत नाही किंवा जाळीदार टेक्सचर येत नाही. पण काही सोप्या ट्रिक्स वापरल्यातर मऊ-जाळीदार मटार ढोकळा तयार होईल. पाहूया सोपी रेसिपी.
वरण-भातासोबत तोंडी लावायला बेस्ट ऑप्शन, घरीच बनवा शिराळ्याच्या सालीची चटकदार चटणी- पारंपरिक पदार्थ
साहित्य
मटार - १ कप
पाणी - आवश्यकतेनुसार
हिरवी मिरची - २
आले - १ इंच
कोथिंबीर - अर्धा कप
दही - २ चमचे
बेसनाचे पीठ - १ कप
रवा - ४ चमचे
इनो - २ चमचे
तेल - २ चमचे
मोहरी - अर्धा चमचा
हिंग - १/४ चमचा
पांढरे तीळ - २ चमचे
कढीपत्त्याची पाने
कृती
1. सगळ्यात आधी मटार स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात हिरवे मटार, हिरवी मिरची, आले, कोथिंबीर आणि पाणी घालून त्याची पेस्ट तयार करा.
2. आता एका बाऊलमध्ये रवा, बेसन, दही आणि तयार पेस्ट घालून त्याचे मिश्रण तयार करा. हे मिश्रण ३० मिनिटे झाकून ठेवा.
3. यामध्ये मीठ, बेकिंग सोडा आणि किंचित पाणी घालून मिक्स करा. आता गॅसवर स्टीमचे भांड ठेवून ताटाला ग्रीस करा. तयाप ढोकळ्याचे बॅटर त्यावर पसरवून घ्या. वरुन लाल तिखट स्प्रेड करा. १० ते १२ मिनिटानंतर ढोकळा फुगला आहे की नाही ते तपासा.
4. ढोकळा थंड झाल्यानंतर त्याचे तुकडे करा. फोडणी पात्रात तेल, मोहरी, हिंग, तीळ आणि कढीपत्ता घालून फोडणी तयार करा. आता ढोकळ्यावर ही फोडणी पसरवून घ्या. हिरव्या किंवा चिंचेच्या चटणीसोबत खा हिरव्या मटारचा ढोकळा.
