Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाजरीची भाकरी तुटते-जमत नाही? ५ मिनिटांत करा बाजरीचे जाळीदार घावणे, मऊ लुसलुशीत मस्त नाश्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2025 10:12 IST

Bajra ghavane recipe: Bajra breakfast recipe: Soft bajra bhakri tips: झटपट आणि हमखास करता येणारा पदार्थ म्हणजे बाजरीचे जाळीदार घावणे.

हिवाळ्यात बाजरी ही आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा पदार्थ आहे. यात फायबर, आयर्न, कॅल्शियम आणि उष्णता देणारे गुणधर्म सगळ्यात जास्त असतात.(Bajra ghavane recipe) त्यामुळे ग्रामीण भागात आजही भाकरी आवडीने खाल्ली जाते. बाजरीची भाकरी, हलवा, खिचडी हा सगळ्यांचा आवडता पदार्थ. पण अनेकांना बाजरीची भाकरी बनवायला नीट जमत नाही.(Bajra breakfast recipe) कधी भाकरी तुटते, कधी हाताला चिकटते तर कधी तव्यावर टाकताच फुटते.(Soft bajra bhakri tips) अशावेळी बाजरीची भाकरी नको असं वाटायला लागतं. यावर एक अतिशय सोपा, झटपट आणि हमखास करता येणारा पदार्थ म्हणजे बाजरीचे जाळीदार घावणे. 

बाजरीचे घावणे ही भाकरीपेक्षा खूपच सोपे, कमी कष्टाचे आणि वेळ वाचवणारा पदार्थ. हे घावण करायला हातावर थाप मारावी लागत नाही किंवा भाकरीसारखी कसरत करण्याची देखील गरज पडत नाही. फक्त पीठ योग्य प्रकारे भिजवलं आणि तव्यावर ओतलं की पाच मिनिटांत मऊ-लुसलुशीत घावणे तयार होतात. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. 

केस गळतात, शेपटीसारखे दिसतात? आयुर्वेदिक हर्बल शाम्पू करा घरीच, केसांच्या समस्या संपतील- होतील चमकदार

साहित्य 

बाजरीचे पीठ - १ वाटी लसूण पाकळ्या - ४ ते ५हिरव्या मिरच्या - ३ ते ४ओवा- १ चमचा जिरे - १ चमचा हळद - १ चमचा लाल मिरची पावडर - १ चमचा धने पावडर - १ चमचामीठ - चवीनुसार बारीक चिरलेला कांदा - १ वाटी कोथिंबीर - १ चमचा दही- १ वाटी किसलेला गाजर - १ छोटी वाटीतीळ - १ चमचा 

 

कृती 

1. सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात लसूण, हिरव्या मिरच्या, ओवा आणि जिरे घालून त्याची पेस्ट तयार करा. 

2. आता एका वाटीत बाजरीचे पीठ घेऊन त्यात हळद, लाल मिरची पावडर, धने पावडर, मीठ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, दही आणि किसलेला गाजर घाला. वाटलेले सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करा.  

3. त्यात वाटीभर पाणी घाला. चमच्याने ढवळून घ्या, त्याच्या गुठळ्या राहाणार नाही याची काळजी घ्या. यात पुन्हा पाणी घालून पातळ असे बॅटर तयार करा. 

4. गॅसवर तवा तापवून त्यावर तेल शिंपडा. तीळ पसरवून घ्या. त्यावर तयार बॅटर पसरवून घ्या. दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजल्यानंतर तयार होईल बाजरीचे घावणे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Easy Bajra Ghavane Recipe: A soft, quick alternative to Bhakri.

Web Summary : Struggling with Bajra Bhakri? Try Bajra Ghavane! This quick recipe uses millet flour, spices, and vegetables for a soft, delicious, and easy-to-make breakfast. Perfect for a healthy, fuss-free start.
टॅग्स :अन्नपाककृती