Join us
Daily Top 2Weekly Top 5

सकाळच्या नाश्त्याला करा हिरव्या मुगाची इडली! सुपरहेल्दी आणि पौष्टिक इडलीची सोपी रेसिपी- भरपूर प्रोटीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2025 09:43 IST

Green moong idli: Protein rich idli: Healthy idli recipe: मऊ, लुसलुशीत आणि छान टम्म फुगणारी हिरव्या मुगाची इडली कशी करायची पाहूया.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सकाळचा नाश्ता हा पौष्टिक, तितकाच हलका आणि झटपट होणारा असायला हवा. साऊथ इंडियन पदार्थ, पोहे, उपमा आपण कायमच खातो.(Green moong idli) इडली, डोसा हे पदार्थ बहुतेक घरांमध्ये आवडीने खाल्ले जातात.(Protein rich idli) हे पदार्थ पचायला हलके देखील असतात. नाश्त्याला किंवा डब्यासाठी हे पदार्थ करताना आपला अधिक वेळसुद्धा जातो.(Healthy idli recipe) अशा वेळी झटपट तयार होणारी हिरव्या मुगाची इडली आपण नक्की ट्राय करु शकतो. अनेकदा घराच्यांना तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो. यावेळी आपण हिरव्या मुगाची इडली बनवू शकतो. मूग शरीराला पचायला हलका असल्यामुळे सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट मानला जातो.(Soft idli tips) हिरव्या मुगाला भिजवून तयार केलेली इडली केवळ हेल्दीच नसून, चवीलाही परफेक्ट येते. मऊ, लुसलुशीत आणि छान टम्म फुगणारी हिरव्या मुगाची इडली कशी करायची पाहूया. 

अस्सल गावरान पद्धतीची शेव-टोमॅटो भाजी, १५ मिनिटांत होईल चमचमीत पदार्थ, चवीलाही बेस्ट-सोपी रेसिपी

साहित्य 

ज्वारी – १ कप हिरवे मूग –  अर्धा कप काळे उडीद – २ चमचेमेथी दाणे – १ चमचालाल मिरची – २मिरे – ६ ते ७मीठ – चवीनुसार डाळ (फुटाणे) – २ चमचे  शेंगदाणे – २ चमचेपुदिन्याची पाने – ५ ते ६ कोथिंबीर – मूठभर लसूण – २ पाकळ्याहिरवी मिरची – १ ते २ आलं – अर्धा इंच जिरे – अर्धा चमचाहिंग – चिमूटभर लिंबूरस – १ चमचा  पाणी – गरजेनुसार जिरे–मोहरीची फोडणी 

वयाच्या चाळिशीतही दिसाल मॉर्डन अन् ट्रेंडी! प्रत्येक महिलेकडे हव्याच ५ साड्या, दिसाल एकदम क्लासिक

कृती 

1. सगळ्यात आधी ज्वारी, हिरवे मूग, काळे उडीद, मेथी दाणे धुवून घ्या. नंतर त्यात लाल मिरची, काळी मिरी आणि पाणी घालून ८ ते १० तास आंबवण्यास ठेवा. 

2. दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवा. नंतर त्यात लाल मिरची, मीठ घालून रात्रभर आंबवण्यासाठी ठेवा. 

3. नंतर मिक्सरच्या भांड्यात डाळ, शेंगदाणे, कढीपत्ता, आलं, लसूण, हिंग, लिंबाचा रस घालून वाटणं तयार करा. वरुन जिरे आणि मोहरीची फोडणी द्या. 

4. आता इडली पात्राला तेल लावून बॅटर घालून वाफवून घ्या. तयार होईल हिरव्या मुगाची पौष्टिक इडली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Green Moong Idli: A healthy, protein-rich breakfast recipe.

Web Summary : Make a quick and nutritious breakfast with green moong idli. It's a healthy and tasty alternative to regular idli, perfect for those seeking a protein-rich, easy-to-digest meal. The recipe involves soaking ingredients, grinding them into a batter, and steaming to create soft and fluffy idlis.
टॅग्स :अन्नपाककृती