'सांबार राईस' हा दक्षिण भारतीय पारंपरिक आणि लोकप्रिय पदार्थ आहे, जो चविष्ट - पौष्टिक आणि पचायला हलका असतो. बरेचदा आपल्याला रोजच्या त्याच त्या जेवणाचा(How To Make Sambar Rice At Home)कंटाळा येतो, अशावेळी काहीतरी वेगळं पण चटपटीत - मसालेदार खावंसं वाटत. खरंतर, सांबार राईस हा थोडाफार खिचडी सारखाच प्रकार. तांदूळ, तूर डाळ, भाज्या आणि खास सांबार मसाला, हिंग-मोहरीची फोडणी घालून तयार केलेला सांबार राईस (hotel style sambar rice recipe) म्हणजे चमचमीत मेजवानीच. शाळा, ऑफिस किंवा घाईगडबडीच्या वेळी पटकन आवरायचं असल्यास सांबार राईस (Quick Sambar Rice Recipe in Cooker 15 Mins) हा नेहमीच एक परफेक्ट वन-पॉट मील पदार्थ मानला जातो(Multipurpose South Indian Veggie Sambar Rice).
नेहमीच्या खिचडीला थोडासा ट्विस्ट देत आपण असा चमचमीत सांबर राईस अगदी झटपट घरच्याघरीच करु शकतो. सांबर राईस अगदी घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात करता येतो. सांबार राईसची चमचमीत, चटपटीत, आंबट गोड चव घरातील सगळ्यांना हमखास आवडेल अशीच लागते. सांबार आणि भात असे दोन वेगवेगळे पदार्थ तयार करण्यापेक्षा आपण पटकन एकच सांबार राईस करु शकतो. दाक्षिणात्य पद्धतीचा अस्स्सल पारंपरिक चवीचा सांबार राईस करण्याची सोपी रेसिपी पाहूयात..
साहित्य :-
१. तांदूळ - १ कप
२. पिवळी तूर डाळ - १/२ कप
३. साजूक तूप - २ टेबलस्पून
४. मोहरी - १/२ टेबलस्पून
६. लसूण पाकळ्या - ३ ते ६ (बारीक चिरलेला)
७. काळीमिरी - ३ ते ६ तुकडे
८. हिंग - १/२ टेबलस्पून
९. कडीपत्ता - १० ते १२ पान
१०. लाल सुक्या मिरच्या - ४ ते ५
११. हिरव्या मिरच्या - ३ ते ४
१२. छोटे कांदे - १ कप
१३. टोमॅटो - १ कप (बारीक चिरलेला)
१४. वांग - १/२ कप (छोटे तुकडे केलेले)
१५. भोपळा - १/२ कप (छोटे तुकडे केलेले)
१६. गाजर - १/२ कप (छोटे तुकडे केलेले)
१७. बटाटा - १/२ कप (छोटे तुकडे केलेले)
१८. शेवग्याच्या शेंगा - १/२ कप (छोटे तुकडे केलेले)
१९. सांबार मसाला - २ टेबलस्पून
२०. हळद - १/२ टेबलस्पून
२१. चिंचेचा कोळ - २ टेबलस्पून
२२. मीठ - चवीनुसार
२३.पाणी - गरजेनुसार
२४. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून
२५. कोथिंबीर - २ टेबलस्पून
भाजी-आमटीत गरम मसाला कधी आणि कसा घालावा ? परफेक्ट पद्धत-पदार्थ बिघडणार नाही होईल चविष्ट...
कृती :-
१. एका मोठ्या भांड्यात तांदूळ व तूर डाळ एकत्रित घेऊन २ ते ३ वेळा स्वच्छ धुवून घ्यावी. त्यानंतर डाळ व तांदूळ पाण्यांत १० ते १५ मिनिटे भिजत ठेवावे.
२. आता कुकरमध्ये थोडे साजूक तूप घालून मग त्यात मोहरी, बारीक चिरलेला लसूण, काळीमिरी, हिंग, कडीपत्ता ,लाल सुक्या मिरच्या ,हिरव्या मिरच्या घालूंन खमंग अशी फोडणी तयार करून घ्यावी.
३. आता या फोडणीत बारीक चिरलेला टोमटो, छोटे गोलाकार आकाराचे कांदे, तसेच छोटे तुकडे केलेल वांग, भोपळा, गाजर, बटाटा, शेवग्याच्या शेंगा अशा सगळ्या भाज्या घालाव्यात.
पोह्याच्या पुऱ्या करा पोह्याच्या पुऱ्या! कांदेपोहे खाताच, मात्र पोह्याचा हा पदार्थ पावसाळा स्पेशल...
४. आता या सगळ्या भाज्या खमंग तेलात परतवून २ ते ३ मिनिटे शिजवून घ्याव्यात. त्यानंतर या भाज्यांमध्ये चवीनुसार सांबार मसाला, चिंचेचा कोळ, मीठ चवीनुसार, बारीक चिरलेली कोथिंबीर असे सगळे जिन्नस घालावे. सगळ्यात शेवटी यात पाण्यांत भिजवून घेतलेली डाळ व तांदूळ घालावे. आता सगळे जिन्नस एकत्रित कालवून यात गरजेनुसार पाणी घालून कुकरचे झाकण लावून २ ते ३ शिट्ट्या काढून शिजवून घ्यावा.
आपला सांबार राईस खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम सांबार राईस व तोंडी लावायला चटपटीत लोणचं आणि पापड असेल तर मग बेत होईल झक्कास.