गणपती बाप्पा येणार म्हटल्यावर आपल्या घरात विविध पदार्थांची रेलचेल सुरु होते. (Ganesha Naivedya modak) बाप्पाच्या आवडीचे पदार्थ लाडू, मोदक आपण बनवतो. (Soft ukadiche modak recipe) पण सगळ्यात जास्त आवडीचा पदार्थ उकडीचे मोदक. अनेक घरांमध्ये गणपती आले की घरात मोदकांचा सुगंध दरवळू लागतो. (Sweet modak recipe at home) तांदळाची उकड काढून आपण उकडीचे मोदक तयार करतो. (Easy modak recipe for Ganesh Chaturthi) पण अनेकदा ते व्यवस्थित बनत नाही किंवा फुटतात. (Sweet modak recipe at home) पीठ अधिक कडक होते. कळ्या नीट पडत नाही. (How to make soft and sweet modak without cracks) आपल्या अनेक छोट्या-मोठ्या चुकांमुळे आपला पदार्थ फसतो. अनेकदा तर आपल्या नवीन काही तरी ट्राय करायचे असते पण पदार्थ बिघडेल की, काय? अशी भीती वाटू लागते. (Special festive modak recipe for Ganesh Chaturthi offering) पण कधी गुलाबी रंगाचे उकडीचे मोदक ट्राय केले का? रोझ फ्लेवर उकडीचा मोदक कसा बनवायचा, यासाठी लागणारे साहित्य पाहूया.
साहित्य
तूप - ४ चमचे
खसखस - १ चमचा
ओल्या नारळाचा किस - १ वाटी
रोझ सिरम
गुलकंद - २ चमचे
पिठीसाखर - १ वाटी
मीठ - चवीनुसार
ड्रायफ्रुट्स - आवडीनुसार
तांदळाची उकड
गुलाब पाणी
कृती
1. सगळ्यात आधी नारळाचा किस खवून घ्या. आता एका पॅनमध्ये तूप चांगले गरम करुन त्यात खसखस भाजून घ्या. त्यात नारळाचा किस चांगला परतवून घ्या. यामध्ये रोझ सिरम घालून एकजीव करा. त्यानंतर गुलकंद, पिठीसाखर, मीठ आणि ड्रायफ्रुट्स घालून सर्व सारण एकजीव करा.
2. आता तांदळाची उकड काढण्यासाठी टोपात पाणी गरम करा. त्यात मीठ, चमचाभर तूप, गुलाब पाणी आणि रोझ सिरम घाला. दुसऱ्या बाजूला तांदळाची पीठ चाळून घ्या. त्यानंतर उकळत्या पाण्यात पीठी घालून चमच्याने फिरवून घ्या.
3. ताटात तयार तांदळाची उकड काढून घ्या. वाटीच्या सहाय्याने व्यवस्थित एकजीव करा. आता कणिक मळतो अगदी तसेच उकड मळून घ्या. थोडे तूप घालून व्यवस्थित मळा. पांढरा कापड ओला करुन तांदळाच्या पीठावर झाका, म्हणजे पीठ कडक होणार नाही.
4. गॅसवर पातेल ठेवून त्यात पाणी घाला आणि वरुन चाळणी ठेवा. त्यात केळीचे किंवा हळदीचे पान ठेवा. मोदक वळवताना पीठाचा गोळा व्यवस्थित मळून घ्या. सुंदर- छान अशा कळ्या पाडून घ्या. त्यात सारण भरून कळ्या बंद करा आणि मोदक वळवा.
5. आता तयार मोदक पाण्यात बुडवून घ्या. आता तयार चाळणीवर मोदक ठेवून झाकूण ठेवा. वाफ आल्यानंतर वरुन तुपाची धार सोडा. मोदक पाण्यात भिजवल्यानंतर ते वाफवताना कडक होत नाही तसेच तुटत देखील नाही.