शिराळ्याची भाजी अर्थात दोडक फार कमी घरामध्ये आजही खाल्ल जातं. दोडकं म्हणजे अनेकांची नावडती भाजी. लहानच काय अगदी मोठेही खाताना नखरे करतात.(ridge gourd peel chutney) चवच आवडत नाही, शी बाई कशी लागते ती भाजी किंवा अगदीच मिळमिळत चव.(traditional Maharashtrian chutney) पण दोडक्यात जीवनसत्त्व सी, ए, बी जास्त प्रमाणात असते. अतिशय चवदार आणि पौष्टिक पदार्थ हा आहे. (varan bhaat side dish)आपण ही भाजी बनवताना अनेकदा तिची साल सर्रास फेकून देतो. आपल्या आजी-आजोबांच्या काळात भाजीचा प्रत्येक भाग हा वेगळ्या पद्धतीने उपयोगात आणला जायचा. शिराळा, दोडका, दुधी भोपळा यांसारख्या भाज्यांच्या सालींपासून तयार होणाऱ्या चटण्या या केवळ चवीलाच नाही तर आरोग्यालाही फायदेशीर मानल्या जातात. शिराळ्याची साल ही फायबरने समृद्ध आहे. शिराळ्याच्या सालीची चटणी ही साधी, झटपट आणि कमी खर्चात तयार होणारी रेसिपी आहे. ही चटणी वरण-भातासोबत चवीला अप्रतिम लागते, कशी बनवायची पाहूया.
घटस्फोट झाला, नातं संपलं, तरी 'रेहना हाय तेरे दिल में, किरण रावच्या मनात अजूनही नाव आमिरच?
साहित्य
शिराळ्याची साल - १ वाटी ओले खोबरे - १ वाटीतीळ - १ वाटी तेल - १ चमचा बारीक चिरलेला लसूण - ७ ते ८ पाकळ्याजिरे - १ चमचाबारीक चिरलेला कांदा - १ वाटीलाल तिखट - १ चमचा हळद - १ चमचा गरम मसाला - १ चमचा धने पावडर - १ चमचा मीठ - चवीनुसार
1. सगळ्यात आधी शिराळ्याचे साल काढून सुरीने कापून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात त्याला थोडे वाटून घ्या. खूपही वाटू नका.
2. यानंतर कढई गरम करुन त्यात शिराळ भाजून घ्या. आता ओले खोबरे आणि तीळ वेगवेगळ्या पद्धतीने भाजून घ्या.
3. कढईत तेल गरम करुन त्यात बारीक चिरलेला लसूण, जिरे, कांदा घालून चांगले परतवून घ्या. वरुन लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने पूड आणि मीठ घालून मसाला एकजीव करा.
4. यात भाजलेले शिराळे, ओले खोबरे आणि तीळ घालून मिश्रण एकजीव करा. तयार होईल कुरकुरीत शिराळ्याची चटणी.
Web Summary : Ridge gourd peel chutney is a nutritious, simple, and quick recipe. The peel is rich in fiber. It makes a great side dish with varan bhaat.
Web Summary : तुरई के छिलके की चटनी एक पौष्टिक, सरल और त्वरित रेसिपी है। छिलका फाइबर से भरपूर होता है। यह वरण भात के साथ एक बेहतरीन साइड डिश है।