Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > वरण-भातासोबत तोंडी लावायला बेस्ट ऑप्शन, घरीच बनवा शिराळ्याच्या सालीची चटकदार चटणी- पारंपरिक पदार्थ

वरण-भातासोबत तोंडी लावायला बेस्ट ऑप्शन, घरीच बनवा शिराळ्याच्या सालीची चटकदार चटणी- पारंपरिक पदार्थ

ridge gourd peel chutney: traditional Maharashtrian chutney: varan bhaat side dish: ही चटणी वरण-भातासोबत चवीला अप्रतिम लागते, कशी बनवायची पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2025 09:30 IST2025-12-30T09:30:00+5:302025-12-30T09:30:02+5:30

ridge gourd peel chutney: traditional Maharashtrian chutney: varan bhaat side dish: ही चटणी वरण-भातासोबत चवीला अप्रतिम लागते, कशी बनवायची पाहूया.

how to make ridge gourd peel chutney at home traditional Maharashtrian dodka peel chutney recipe best side dish for varan bhaat healthy chutney using vegetable peels | वरण-भातासोबत तोंडी लावायला बेस्ट ऑप्शन, घरीच बनवा शिराळ्याच्या सालीची चटकदार चटणी- पारंपरिक पदार्थ

वरण-भातासोबत तोंडी लावायला बेस्ट ऑप्शन, घरीच बनवा शिराळ्याच्या सालीची चटकदार चटणी- पारंपरिक पदार्थ

शिराळ्याची भाजी अर्थात दोडक फार कमी घरामध्ये आजही खाल्ल जातं. दोडकं म्हणजे अनेकांची नावडती भाजी. लहानच काय अगदी मोठेही खाताना नखरे करतात.(ridge gourd peel chutney) चवच आवडत नाही, शी बाई कशी लागते ती भाजी किंवा अगदीच मिळमिळत चव.(traditional Maharashtrian chutney) पण दोडक्यात जीवनसत्त्व सी, ए, बी जास्त प्रमाणात असते. अतिशय चवदार आणि पौष्टिक पदार्थ हा आहे. (varan bhaat side dish)
आपण ही भाजी बनवताना अनेकदा तिची साल सर्रास फेकून देतो. आपल्या आजी-आजोबांच्या काळात भाजीचा प्रत्येक भाग हा वेगळ्या पद्धतीने उपयोगात आणला जायचा. शिराळा, दोडका, दुधी भोपळा यांसारख्या भाज्यांच्या सालींपासून तयार होणाऱ्या चटण्या या केवळ चवीलाच नाही तर आरोग्यालाही फायदेशीर मानल्या जातात. शिराळ्याची साल ही फायबरने समृद्ध आहे. शिराळ्याच्या सालीची चटणी ही साधी, झटपट आणि कमी खर्चात तयार होणारी रेसिपी आहे. ही चटणी वरण-भातासोबत चवीला अप्रतिम लागते, कशी बनवायची पाहूया. 

घटस्फोट झाला, नातं संपलं, तरी 'रेहना हाय तेरे दिल में, किरण रावच्या मनात अजूनही नाव आमिरच?

साहित्य 

शिराळ्याची साल - १ वाटी 
ओले खोबरे - १ वाटी
तीळ -  १ वाटी 
तेल - १ चमचा 
बारीक चिरलेला लसूण - ७ ते ८ पाकळ्या
जिरे - १ चमचा
बारीक चिरलेला कांदा - १ वाटी
लाल तिखट - १ चमचा 
हळद - १ चमचा 
गरम मसाला - १ चमचा 
धने पावडर - १ चमचा 
मीठ - चवीनुसार 


कृती 

1. सगळ्यात आधी शिराळ्याचे साल काढून सुरीने कापून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात त्याला थोडे वाटून घ्या. खूपही वाटू नका. 

2. यानंतर कढई गरम करुन त्यात शिराळ भाजून घ्या. आता ओले खोबरे आणि तीळ वेगवेगळ्या पद्धतीने भाजून घ्या. 

3. कढईत तेल गरम करुन त्यात बारीक चिरलेला लसूण, जिरे, कांदा घालून चांगले परतवून घ्या. वरुन लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने पूड आणि मीठ घालून मसाला एकजीव करा. 

4. यात भाजलेले शिराळे, ओले खोबरे आणि तीळ घालून मिश्रण एकजीव करा. तयार होईल कुरकुरीत शिराळ्याची चटणी. 


Web Title : तुरई के छिलके की चटनी: वरण भात के साथ सबसे अच्छा साइड डिश।

Web Summary : तुरई के छिलके की चटनी एक पौष्टिक, सरल और त्वरित रेसिपी है। छिलका फाइबर से भरपूर होता है। यह वरण भात के साथ एक बेहतरीन साइड डिश है।

Web Title : Ridge gourd peel chutney: Best side dish with varan bhaat.

Web Summary : Ridge gourd peel chutney is a nutritious, simple, and quick recipe. The peel is rich in fiber. It makes a great side dish with varan bhaat.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.