आज काय बनवाव असा प्रश्न कायम आपल्या पडतो. घरातल्या माणसांना देखील तेच ते पदार्थ खाऊन वैताग येतो.(veg pulao recipe) काही तरी चमचमीत आणि झणझणीत खाण्याची इच्छा त्यांची कायम होत असते. रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात काही तरी साध खाण्याची इच्छा होते त्यावेळी आपण वरण-भात किंवा खिचडी खातो.(restaurant style veg pulao) पण आपल्याला साधा वरण भात खाण्याचा देखील कंटाळा येतो. घरात आपल्या पाहुणे आले असतील किंवा छोटी पार्टी असेल तर पुलाव हा चांगला पर्याय आहे.(easy veg pulao recipe)
व्हेज पुलाव करताना आपण आपल्या आवडीच्या भाज्या यात घालू शकतो. विविध मसाले घालून आपण पदार्थांची चव वाढवू शकतो.(homemade veg pulao) यात फ्लॉवर, फरसबी घातल्यास आपल्याला पोषण आणि चव दोन्ही मिळेल. परफेक्ट व्हेज पुलाव बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया.(vegetable rice recipe)
साहित्य
तांदूळ - दीड कप
मीठ - चवीनुसार
तेल -२ चमचे
पाणी - ७ ते ८ कप
लिंबाचा रस- १ चमचा
बटर - २ चमचे
चिरलेला कांदा- १ कप
चिरलेला लसूण- २ चमचे
चिरलेले आले- १ चमचा
चिरलेली हिरवी मिरची- १ चमचा
फरसबी बारीक चिरून - १/४ कप
गाजर बारीक चिरून- १/४ कप
शिमला मिरची बारीक चिरून- १/४ कप
मटार- १/४ कप
टोमॅटो- १ १/४ कप
बीट- १ लहान तुकडा
उकडलेला बटाटा- १ मध्यम
पनीर - १५० ग्रॅम
लाल मिरची पावडर - १ टीस्पून
पाव भाजी मसाला - दीड चमचा
कसूरी मेथी- १ चमचा
कृती
1. सगळ्यात आधी आपल्याला तांदूळ शिजवून घ्यावे लागतील. त्यासाठी पातेल्यात पाणी घालून त्यात धुतलेले तांदूळ, मीठ, तेल आणि लिंबाचा रस घाला. मोकळा भात तयार होईल. ताटात काढून पसरवून घ्या.
2. आता पॅन गरम करुन त्यात तेल घाला. नंतर चमचाभर बटर घालून वितळवून घ्या. आता त्यात आले, लसूण घाला. चांगले परतवून घ्या. त्यात हिरव्या मिरच्या आणि कांदा घालून परतवा. शिमला मिरची, फरसबी, मटार, गाजर आणि मीठ घालून चांगले परतवून घ्या. टोमॅटो आणि बीट किसून घाला. पुन्हा व्यवस्थित परतवून घ्या.
3. यात आता चमचाभर बटर घाला. कसुरी मेथी, पाव भाजी मसाला, काश्मिरी लाल तिखट, मीठ घालून चांगले परतवून घ्या. वरुन पनीर आणि मॅश केलेला बटाटा घालून परतवा. तयार अर्धी भाजी काढून घ्या. त्यात उकडलेला भात आणि पाव भाजी मसाला घालून परतवा. तयार होईल झणझणीत व्हेज पुलाव.
