सध्याच्या धावपळीच्या जीवनात रात्रीच्या वेळी नेमकं काय जेवावं, हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो. डिनर असा असावा जो बनवायला सोपा, चवीला चटपटीत आणि शरीरासाठी पौष्टिक असेल.(Soya veg fried rice) जर आपल्याला 'चायनीज' खायची इच्छा असेल, पण बाहेरचं अनहेल्दी अन्न टाळायचं असेल. तर सोया व्हेज फ्राईड राइस हा एक चांगला पर्याय आहे.(Restaurant style fried rice) सोया चंक्समुळे या भाताला 'हाय-प्रोटीन' मिळते, हॉटेलसारखा स्मोकी आणि चविष्ट फ्राईड राइस घरच्या घरी १० मिनिटांत कसा बनवायचा. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. (High protein fried rice)
साहित्य शिजवलेला भात - १ कपसोया चंक्स - १/२ कप पनीरचे तुकडे - १/२ कप बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेले गाजर बारीक चिरलेल्या फरसबीबारीक चिरलेली सिमला मिरची बारीक चिरलेला लसूण आणि हिरवी मिरची उकडलेले मक्याचे दाणे हिरवे वाटाणे काळी मिरी पूड जिरे - १ चमचा मीठ
कृती
1. सगळ्यात आधी तांदूळ स्वच्छ धुवून त्याचा भात तयार करा. यानंतर एका बाऊलमध्ये सोया चंक्स घेऊन ते गरम पाण्यात भिजवा.
2. कढईमध्ये तेल गरम करुन त्यात जिरे, लसूण, हिरवी मिरची, कांदा, गाजर, मक्याचे दाणे, शिमला मिरची घालून चांगले परतवून घ्या. त्यात भिजवलेले सोया चंक्स आणि पनीरचे तुकडे घालून पुन्हा एकजीव करा.
3. त्यात उकडलेला भात, काळी मिरी पावडर आणि मीठ घालून पुन्हा एकजीव करा. तयार होईल हाय प्रोटीन सोया व्हेज फ्राईड राइस.
Web Summary : Struggling with dinner ideas? Try this quick, healthy soya veg fried rice! Packed with protein from soya chunks, it's a tasty, restaurant-quality meal ready in minutes. A simple recipe for a nutritious dinner.
Web Summary : रात के खाने के लिए कुछ आसान और पौष्टिक चाहिए? यह सोया वेज फ्राइड राइस झटपट बनाएं! सोया चंक्स से भरपूर प्रोटीन, मिनटों में तैयार। यह स्वादिष्ट और पौष्टिक भोजन है। एक सरल रेसिपी।