ताटाची डावी बाजू अगदी चविष्ट करायची असेल तर लोणची असायलाच हवे. उन्हाळा सुरु झाला की, लोणचे किंवा चटणी असेल तर जेवणाची चव दुप्पट होते.(Traditional red chili pickle recipe) या काळात वाळवणाचे पदार्थ आणि वर्षभर साठवता येणारे लोणचे बनवले जाते. लोणच म्हटलं की, कैरी, लिंबांचे किंवा मिक्स लोणचे बाजारत ही हमखास पाहायला मिळते. (Spicy homemade chili pickle)उन्हाळ्यात पापड, कुरडईसह लोणच बनवण्याची देखील पद्धत आहे. (Indian-style red chili pickle) यंदाच्या उन्हाळ्यात वेगळ्या पद्धतीचे पारंपरिक लोणचे बनवा. अगदी कमी तेलात बनवता येईल झणझणीत लोणचं. भात-भाकरीसोबत केव्हाही चव चाखू शकतो. पाहूया बनवण्याची सोपी पद्धत (No-oil or low-oil chili pickle)
उन्हाळा स्पेशल: काकडी-पुदिन्याचे ताक, उत्तम पाचक आणि चवीला इतके भारी की मन भरत नाही! सोपी रेसिपी
साहित्य
लाल मिरची - ३०० ग्रॅममोहरी - २ चमचे धणे - २ चमचे बडीशेप - १ चमचा मेथी दाणे - १/२ चमचा काळी मिरी - ८ ते १० तिळाचे तेल - १ कप आमचूर पावडर - २ चमचे ओवा - १ चमचा कलौंजी - १/२ चमचा काश्मिरी मिरची - २ चमचे हळदी - १ चमचा मीठ - चवीनुसार
कृती
1. सगळ्यात आधी लाल मिरचीला धुवून कापडाने पुसून घ्या. त्यानंतर त्यातील बिया काढून घ्या.
2. दोन ते तीन तास मिरच्या उन्हात वाळवत ठेवा.
3. कढईमध्ये मोहरी, धणे, मेथीचे दाणे, बडीशेप, काळी मिरी आणि लाल मिरची चांगली भाजून घ्या. मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.
4. त्यानंतर एका कढईत तिळाचे तेल गरम करुन थंड होण्यास ठेवा. आता जाडसर वाटलेल्या मसाल्यात आमचूर पावडर, हिंग, ओवा, कलौंजी, काश्मिरी लाल मिरची पावडर , हळद, मीठ आणि चमचाभर तीळाचे तेल घालून मिक्स करा.
5. वरुन त्यात मिरचीच्या बिया घाला. आता सुकवलेल्या मिरच्यांमध्ये तयार केलेला मसाला घाला. थंड केलेल्या तेलामध्ये मिरची बुडवून घ्या. वरुन तिळाचे तेल घाला.
6. तीन दिवस उन्हात सुकवत ठेवून चांगले मुरु द्या. तयार होईल लाल मिरचीचे झणझणीत पारंपरिक पद्धतीचे लोणचे.