उन्हाळा सुरु झाला की आपल्याला शरीराला थंडावा देणाऱ्या आणि जिभेची चव वाढवणाऱ्या पदार्थांची ओढ लागते. उन्हाळ्यात जेवणात फारसे काही गोड तिखट खाण्याची इच्छा होत नाही.(Step by step raw mango curry) पण आंबट-गोड चवीचे पदार्थ मात्र मन तृप्त करतात. अशावेळी कोकणी किंवा महाराष्ट्रीयन घरांमध्ये आवडीने बनवली जाते कैरीची आमटी. दुपारच्या जेवणात गरमागरम मऊ भात आणि त्यावर ही चटपटीत आमटी वाढली जाते, तेव्हा तृप्तीचा ढेकर आल्याशिवाय राहत नाही. (Easy summer lunch ideas)
कैरीची आमटी ही फक्त चविष्ट नसते तर ती आरोग्यासाठीही फायदेशीर असते. उन्हाळ्यामुळे होणारा दाह कमी करण्यासाठी आणि तोंडाची चव परत आणण्यासाठी कैरी हा एक चांगला पर्याय आहे.(Refreshing Konkani food recipes) आपण कैरीचे पन्ह, लोणचं, कढी , मुरंबा, चटणी यांसारखे पदार्थ खाल्ले असतीलच. पण कैरीची आमटी कशी बनवायची, यासाठी लागणारे साहित्य कोणते पाहूया.
घरातील झुरळं- पाली जातील पळून, केमिकल स्प्रे सोडा, ५ नैसर्गिक उपाय - किचन राहील एकदम चकाचक
साहित्य
किसलेली कच्ची कैरी - १
किसलेले ओले खोबरे - १ वाटी
हिरव्या मिरच्या - २ ते ३
आले -१ तुकडा
लसूण - ५ ते ६ पाकळ्या
लाल तिखट - १ चमचा
काश्मिरी लाल तिखट - १ चमचा
गरम मसाला - १ चमचा
धणे पूड - १ चमचा
तांदळाचे पीठ - १ चमचा
तेल - २ चमचे
मोहरी - १ चमचा
हळद - १ चमचा
हिंग - १ चमचा
मेथी दाणे - फोडणीसाठी
कढीपत्ता - ७ ते ८ पाने
मीठ - चवीनुसार
गूळ - चवीनुसार
पाणी - आवश्यकतेनुसार
बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती
1. सगळ्यात आधी कैरी स्वच्छ धुवून ती किसून घ्या. ओले खोबरे देखील किसून घ्या. यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात किसलेले ओले खोबरे, हिरवी मिरची, लसूण पाकळ्या, लाल तिखट, काश्मिरी लाल तिखट, गरम मसाला, धणे पूड आणि पाणी घालून याचे बारीक पेस्ट तयार करा.
2. वाटलेल्या मिश्रणात तांदळाची पावडर आणि पाणी घालून पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घ्या. तयार वाटण चमच्याने फिरवून घ्या.
3. आता कढईमध्ये तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, मेथी दाणे, कढीपत्ता आणि हळद घालून तडतडू द्या. यामध्ये मिक्सरमध्ये वाटलेली पेस्ट घालून चमच्याने परतवून घ्या. मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून मिश्रण थोडेसे पातळ करा.
4. यात वरुन गूळ, चवीनुसार मीठ, किसलेली कैरी आणि थोडेसे पाणी घाला. कोथिंबीर घालून उकळी येण्यास ठेवा. उकळी आल्यानंतर गरमागरम भातासोबत खा कैरीची आमटी.
