उन्हाळा सुरु झाला की बाजारात आपल्याला कैरी पाहायला मिळते. हिरवीगार, आंबट-गोड कैरी खाण्याची बातच काही न्यारी. बरेचदा उन्हामुळे आपल्याला जेवणाची इच्छा उरत नाही किंवा तोंडाला चव येत नाही.(Raw Mango Chutney Recipe) अशावेळी जेवणाच्या ताटात जर कैरीची चटपटीत चटणी असेल तर सध्या वरण-भाताची चवही दुप्पट होते. ही चटणी फक्त चविष्ट नसून उन्हाळ्यातील उष्णतेपासून आपला बचाव करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी देखील गुणकारी आहे. (Kachi Kairi Chatni)कैरीच्या चटणीचे विविध प्रकार आहेत. कुणी त्यात तिखट घालतं तर कुणी गूळ घालून आंबट-गोड करत. पण खरं सुख हे साध्या चटणीतच.(Summer Special Side Dish) ही चटणी बनवायला अत्यंत सोपी आहे आणि यासाठी लागणारे साहित्य आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असते.(Traditional Maharashtrian Recipes) जर आपल्यालाही उन्हाळ्यात दुपारच्या जेवणाचा आनंद वाढवायचा असेल तर ही झटपट होणारी चविष्ट रेसिपी आपण नक्की ट्राय करु शकतो. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.
साहित्य
कैरी - १ मध्यम आकाराची कोथिंबीर - १ वाटी कोथिंबीरीचे देठ - १ वाटी ओले खोबरे - १ छोटी वाटी जिरे - १ चमचामीठ - १ चमचागूळ - १ ते २ चमचेहिरव्या मिरच्या - २ ते ३भाजलेले शेंगदाणे - २ चमचे
कृती
1. सगळ्यात आधी कैरी, कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कैरीचे काप करा. कोथिंबीरीचे देठ वेगळे करा. आता तव्यावर शेंगदाणे भाजून घ्या.
2. यानंतर मिक्सरच्या भांड्यात ओले खोबरे, कोथिंबीर, त्याचे देठ, जिरे, हिरव्या मिरच्या, कैरीचे तुकडे, भाजलेले शेंगदाणे घालून वाटण तयार करा.
3. आता यात गूळ आणि मीठ घालून पुन्हा एकदा हलके फिरवून घ्या. गूळ पूर्ण विरघळला की चटणी तयार.
4. जर आपल्याला अधिक चव हवी असेल, तर वरून मोहरी, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी देऊ शकता.
5. तापाने किंवा उन्हामुळे आपल्या तोंडाची चव गेली असेल तर ही चटणी भूक वाढवण्यास मदत करते. ही चटणी काचेच्या बरणीत भरून ३ ते ४ दिवस चांगली टिकते. चटणी वाटताना त्यात पाणी घालू नका. यामुळे तिची चव बदलते.
Web Summary : Raw mango chutney is a delicious and healthy summer side dish. This simple recipe uses raw mangoes, coriander, coconut, and spices. It aids digestion and provides relief from summer heat. Enjoy it with your meals for added flavor.
Web Summary : कच्चे आम की चटनी एक स्वादिष्ट और सेहतमंद गर्मी का व्यंजन है। इस सरल रेसिपी में कच्चे आम, धनिया, नारियल और मसालों का उपयोग होता है। यह पाचन में मदद करता है और गर्मी से राहत देता है। अतिरिक्त स्वाद के लिए इसे अपने भोजन के साथ आनंद लें।