नाश्त्याला अप्पे आजपर्यंत आपण नेहमीच खाल्ले असू. अप्पे अनेक प्रकारचे केले जातात.(ragi appam recipe) आतापर्यंत आपण तांदळाचे-रव्याचे अप्पे खाल्ले असतीलच. याची प्रोसेस देखील थोडी वेगळी असते.(how to make ragi appam) भिजत घालण्यापासून आंबवण्यापर्यंत बराच वेळ जातो. यात थोडी जरी चूक झाली तरी अप्पे बिघडतात.(healthy South Indian breakfast)
पण अगदी सोप्या पद्धतीने आणि काही मिनिटात तयार होणारे अप्पे आपण बनवणार आहोत.(ragi breakfast recipe) चवीला एकदम मस्त आणि पौष्टिक पदार्थ. नाचणीची भाकरी, चपाती, केक आणि त्यापासून बनवले जाणारे अनेक पदार्थ आपण चवीने खाल्ले असतीलच.(appam with ragi flour) पण कधी नाचणीचे स्टफ अप्पे ट्राय केले आहे. नक्की ट्राय करुन बघा, मुले देखील चवीने खातील. इतकेच नाही तर यामध्ये असणारे घटक आरोग्यासाठी देखील चांगले आहेत.नाचणीचे अप्पे कसे बनवायचे पाहूया रेसिपी. (ragi appam recipe for breakfast)
जंक फूड नको, मुलांना आवडेल असे काबुली चण्याचे बर्गर नक्की करा! पौष्टिक आणि चमचमीत
साहित्य
नाचणीचे पीठ - १ कप
दही - अर्धा कप
रवा - अर्धा कप
पाणी - आवश्यकतेनुसार
मीठ - चवीनुसार
बेकिंग सोडा - अर्धा चमचा
उकडलेला मका - अर्धा कप
किसलेले चीज - अर्धा कप
चिली फ्लेक्स - अर्धा चमचा
मिक्स हर्ब्स - अर्धा चमचा
तेल
कृती
1. सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये नाचणीचे पीठ, दही, रवा, मीठ आणि पाणी घालून बॅटर तयार करा.
2. त्यानंतर भांड्यात उकडलेला मका, किसलेले चीज , चिली फ्लेक्स आणि मिक्स हर्ब्स घालून छान एकजीव करा.
3. तयार बॅटरमध्ये सोडा घालून चांगले फेटून घ्या. आता अप्पे पॅन गरम करुन त्यात तेल पसरवून घ्या.
4. यामध्ये तयार बॅटर घाला. मक्याचे स्टफिंग भरून पुन्हा वरुन नाचणीचे बॅटर घाला.
5. एका बाजून व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने फ्राय करुन घ्या. टम्म फुललेले अप्पे होतील तयार.