Lokmat Sakhi >Food > सकाळच्या नाश्त्याला करा चटपटीत पारंपरिक सुशीला, फक्त १० मिनिटांत तयार- चवही भन्नाट

सकाळच्या नाश्त्याला करा चटपटीत पारंपरिक सुशीला, फक्त १० मिनिटांत तयार- चवही भन्नाट

Traditional Maharashtrian breakfast: Sushila recipe: Quick breakfast recipes: सकाळच्या नाश्त्यात करा सुशीला. विदर्भ आणि मराठवाड्यात सुशीला हा घराघरात बनवला जातो आणि प्रत्येकाच्या घरात त्याची थोडी वेगळी रेसिपी असते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2025 09:30 IST2025-09-15T09:30:00+5:302025-09-15T09:30:02+5:30

Traditional Maharashtrian breakfast: Sushila recipe: Quick breakfast recipes: सकाळच्या नाश्त्यात करा सुशीला. विदर्भ आणि मराठवाड्यात सुशीला हा घराघरात बनवला जातो आणि प्रत्येकाच्या घरात त्याची थोडी वेगळी रेसिपी असते.

How to make quick and spicy Sushila for breakfast Easy Maharashtrian breakfast recipes in 10 minutes | सकाळच्या नाश्त्याला करा चटपटीत पारंपरिक सुशीला, फक्त १० मिनिटांत तयार- चवही भन्नाट

सकाळच्या नाश्त्याला करा चटपटीत पारंपरिक सुशीला, फक्त १० मिनिटांत तयार- चवही भन्नाट

सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं असा प्रश्न रोजच गृहिणींना पडतो. पोहे, उपमा, शिरा यांसारखे पदार्थ अनेकांना खायला आवडत नाही. पण महाराष्ट्रातील अनेक भागात सकाळच्या नाश्त्यात काही पारंपरिक पदार्थ खाल्ले जातात.(Morning Breakfast Idea) त्यातील एक चविष्ट नाश्ता सुशीला. ग्रामीण भागात हा खास सकाळचा किंवा दुपारचे हलके जेवण म्हणून खाल्ला जाणारा पदार्थ. साधा, पौष्टिक आणि पटकन होणारा पदार्थ असल्यामुळे बनवण्यासाठी जास्त वेळही लागत नाही. (Traditional Recipe)
सुशिला हा पदार्थ कुरमुऱ्यांपासून बनवला जातो. विदर्भ आणि मराठवाड्यात सुशीला हा घराघरात बनवला जातो आणि प्रत्येकाच्या घरात त्याची थोडी वेगळी रेसिपी असते.(Traditional Maharashtrian breakfast) काहीजण त्यात कांदा-टोमॅटो घालतात, काही फक्त हिरव्या मिरच्या आणि फोडणी घालून बनवतात.(Sushila recipe) त्यावर शेव किंवा कोथिंबिरीची पेरणी केली की सुशीला अजूनही आकर्षक दिसतो. हा पदार्थ कसा बनवायचा, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. 

ढोकळा हलका होऊन भरपूर फुगण्यासाठी ५ टिप्स, करा परफेक्ट स्पॉँजी ढोकळा एकदम पटकन

साहित्य 

कुरमुरे - १ वाटी 
तेल 
मोहरी - १ चमचा 
कढीपत्ता - ७ ते ८ पाने
शेंगदाणे - १ कप 
बारीक चिरलेली हिरवी मिरची - २
बारीक चिरलेला कांदा - १ वाटी
हळद - १ चमचा 
मीठ - चवीनुसार 
पांढरी डाळ - आवश्यकतेनुसार 
बारीक चिरलेला टोमॅटो - १ वाटी
कोथिंबीर - आवश्यकतेनुसार

कृती 

1. सगळ्यात आधी कुरमुरे अर्धे भिजवून घ्या. नंतर चाळीत पाणी निंतरण्यासाठी ठेवा. आता आपल्याला मोठं पातेल ठेवून त्यात तेल गरम करण्यास ठेवा. तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यात मोहरी, कढीपत्ता, शेंगदाणे घालून तडतडू द्या. 

2. आता हिरवी मिरची घालून चांगले परतवून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून लालसर होऊ द्या. वरुन हळद आणि मीठ घालून पुन्हा परतवून घ्या. आता पांढऱ्या डाळी आणि बारीक चिरलेला टोमॅटो घाला. पुन्हा चांगले परतवून घ्या. 

3. मिश्रण चांगले परतल्यानंतर त्यात वरुन भिजवलेले कुरमुरे घाला. याचा लगदा होणार नाही याची काळजी घ्याल. चमच्याच्या मदतीने सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करुन घ्या. वरुन कोथिंबीर घाला. एका ताटात तयार सुशीला घेऊन वरुन शेव आणि कोथिंबीर घाला. 


Web Title: How to make quick and spicy Sushila for breakfast Easy Maharashtrian breakfast recipes in 10 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.