उन्हाळ्याच्या ऋतूंमध्ये बाजारांत विकली जाणारी टपोरी जांभळं खाण्याचा मोह सगळ्यांनाच होतो. हे फळं दिसायला जरी छोटे असले तरीही ते तितकेच चविष्ट असते. जांभळाची चव आंबट, गोड, तुरट असते. आयुर्वेदानुसार, जांभळाध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. जांभूळ हे फक्त फळच नाही तर त्याच्या झाडाची साल, पाने आणि बियाही खूप फायदेशीर आहेत. मोठ्यांसोबतच लहान मुलांच्या आरोग्यासाठी जांभुळ खूप फायदेशीर मानले जाते. जांभळामध्ये लोह, कॅल्शियम, प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात.
साहित्य :-
१. जांभूळ - अर्धा किलो२. गूळ - २ ते ३ टेबलस्पून ३. जिरे पावडर - १/२ टेबलस्पून ४. आमचूर पावडर - १/२ टेबलस्पून ५. लिंबाचे गोल काप - २ ते ३ ६. पुदिन्याची पाने - ५ ते ६ पाने ७. मध - १ टेबलस्पून
दिवसभर मुलांचा दंगा, काहीतरी खायला दे अशी भूणभूण? करा चीज पराठा, सुटीचा स्पेशल बेत...
कृती :-
१. सर्वप्रथम जांभळं एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यावीत. त्यात १ टेबलस्पून मीठ घालून मग कपभर पाणी घालावे. २. त्यानंतर हे सगळे मिश्रण एका भांड्यात ओतून गॅसवर मंद आचेवर शिजवून घ्यावे. ३. हे मिश्रण शिजत असताना त्यात बारीक किसून घेतलेला गूळ, जिरे पावडर, आमचूर पावडर घालून व्यवस्थित ४ ते ५ मिनिटे शिजवून घ्यावेत. ४. हे मिश्रण शिजवून घेतल्यानंतर एका मोठ्या गाळणीने मिश्रण गाळून घ्यावे. मिश्रण गाळून घेताना त्यातील बिया व गर असे व्यवस्थित गाळून घ्यावे. या जांभळाच्या रसाचा वापर करुन आपण त्यापासून जांभळाचे कुलर व पॉपसिकल्स बनवू शकतो.
जांभळाचे कुलर बनविण्यासाठी :-
१. जांभळाचे कुलर बनवण्यासाठी एका मोठ्या ग्लासात सर्वप्रथम बर्फाचे काही खडे घालून घ्यावे. २. त्यानंतर लिंबाच्या गोल चकत्या पातळसर चकत्या कापून घ्याव्यात. त्या चकत्या या ग्लासात टाकाव्यात. ३. आता पुदिन्याची काही पाने घेऊन ती थोडी बारीक चिरुन ग्लासात घालावीत. ४. सर्वात शेवटी जांभळाचा काढून घेतलेला रस या ग्लासात ओतून थंडगार जांभळाचे कुलर पिण्यासाठी सर्व्ह करावे.
सचिन तेंडुलकर करतो तशी ‘स्पेशल आंबा कुल्फी’ यंदा नक्की करुन पाहा, अशी कुल्फी तुम्ही खाल्ली नसेल...
जांभळाचे पॉपसिकल्स बनवण्यासाठी :-
१. जांभळाच्या रसापासून त्याचे पॉपसिकल्स बनवताना या रसात १ टेबलस्पून मध घालून घ्यावे. २. हे मध व्यवस्थित चमच्याने ढळवून झाल्यानंतर हा रस पॉपसिकल्स तयार करण्याच्या साच्यात ओतावा. ३. आता हे पॉपसिकल्स किमान ७ ते ८ तासांसाठी डिप फ्रिजरमध्ये ठेवून द्यावेत. ४. ७ ते ८ तासांनंतर हे पॉपसिकल्स बनून तयार झाल्यानंतर खाण्यासाठी सर्व्ह करावेत.
जांभळाच्या रसाचे कुलर व पॉपसिकल्स खाण्यासाठी तयार आहे.