Lokmat Sakhi >Food > वाटीभर सायीचे घरीच करा साजूक तूप, फ्रीजमध्ये साय साठवण्याची सोपी ट्रिक- विकतपेक्षाही चांगले

वाटीभर सायीचे घरीच करा साजूक तूप, फ्रीजमध्ये साय साठवण्याची सोपी ट्रिक- विकतपेक्षाही चांगले

how to make ghee from cream: homemade ghee recipe: Indian traditional ghee making: घरी तूप बनवताना साय फ्रीजमध्ये कशी साठवायची?, सायीचे तूप करताना किती दिवसात करावे? वाचा सविस्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2025 19:53 IST2025-08-31T11:31:47+5:302025-08-31T19:53:27+5:30

how to make ghee from cream: homemade ghee recipe: Indian traditional ghee making: घरी तूप बनवताना साय फ्रीजमध्ये कशी साठवायची?, सायीचे तूप करताना किती दिवसात करावे? वाचा सविस्तर

how to make pure ghee at home from milk cream easy method to store malai in fridge for making ghee step by step homemade ghee recipe from cream | वाटीभर सायीचे घरीच करा साजूक तूप, फ्रीजमध्ये साय साठवण्याची सोपी ट्रिक- विकतपेक्षाही चांगले

वाटीभर सायीचे घरीच करा साजूक तूप, फ्रीजमध्ये साय साठवण्याची सोपी ट्रिक- विकतपेक्षाही चांगले

पदार्थाची चव वाढवण्यासाठी तेलासह तुपाचा वापर केला जातो. भारतीय घरांमध्ये रोजच्या आहारात तुपाचे पदार्थ खाल्ले जातात. वरण-भातासोबत, पराठ्यावर, पोळी किंवा गोड पदार्थांमध्ये तुपाचा समावेश केला जातो.(homemade ghee recipe) अनेक घरांमध्ये चांगलं तूप म्हणजेच साजूक तूप खाण्याची आवड असते. विकतचे तूप घेताना अनेकदा त्यात भेसळ असण्याची शक्यता अधिक असते. (pure ghee at home)
अनेकदा घरी तूप बनवताना आपण फ्रीजमध्ये साय साठवून ठेवतो.(store cream for ghee) पण त्याचे तूप कधी बनवायला हवे, साय खराब होऊ नये म्हणून काय करायला हवं.(Indian traditional ghee making) ज्यामुळे तूप जास्त दिवस टिकवेल. जर आपल्यालाही घरी तूप बनवायचे असेल तर या सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवा. 

जीन्स, वन पीस घातल्यावर सुटलेले पोट दिसते? ५ स्टायलिंग टिप्स- बेली फॅटचं टेन्शन नाही, दिसाल एकदम फिट!

जेव्हा आपण दूध उकळवतो त्यावर येणारी साय हवाबंद डब्यात साठवून ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवू शकता. साय फ्रीजमध्ये ७ ते १० दिवसांसाठी फ्रीजमध्ये ठेवा. जर यापेक्षा जास्त दिवस ठेवले तर साय खराब किंवा आंबट होऊन तिचा वास येऊ लागतो. जर आपल्याला तुपाला सुगंध आणि चव हवी असेल तर साय आठवडाभर ठेवून त्याचे तूप तयार करा. 

साय साठवताना डबा व्यवस्थित बंद केला आहे की, नाही याची खात्री करा. जर डबा हवाबंद नसेल तर फ्रीजमधील इतर गोष्टींचा वास त्यात शोषला जाऊ शकतो आणि याचा तुपाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. साय नेहमी फ्रीजच्या थंड भागात ठेवा, फ्रीजच्या दाराजवळ ठेवू नका. कारण फ्रीज वारंवार उघडल्याने आणि बंद केल्याने तापमान बदलते ज्यामुळे साय लवकर खराब होते. 

आपल्याला साय जास्त वेळ फ्रेश ठेवायची असेल तर फ्रीजरमध्ये ठेवा. फ्रीजरमध्ये ठेवलेली साय २० ते २५ दिवस चांगली राहते. फ्रीजरमधून बाहेर काढल्यानंतर सायचे तूप काढण्यासाठी सायीला चांगले वितळवा. जर आपण साय जास्त काळ साठवली तर तितकीच तुपाची गुणवत्ता आणि सुगंध चांगला येतो. ताज्या सायीपासून तूप नेहमी चविष्ट आणि रवाळ बनते. तूप बनवण्यासाठी जेव्हा सायीचा रंग आणि चव बदलतो तेव्हा करावा. साय जास्त वेळ ठेवल्याने खराब होते, ज्यामुळे तुपाला खराब वास येईल. 

Web Title: how to make pure ghee at home from milk cream easy method to store malai in fridge for making ghee step by step homemade ghee recipe from cream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.