बाजारात आपल्याला मक्याची कणसं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असतील. भाजलेलं कणीस किंवा त्यापासून बनवले जाणारे पदार्थ आपण आवडीने खातो.(homemade corn flour vs market corn flour) हिवाळा सुरु झाला की आपण जास्त प्रमाणात भाकरी खातो.(corn flour recipe in Marathi) थंडीच्या मौसमात शरीराला ऊर्जा आणि ऊब देणारे पदार्थ आपण आपल्या आहारात समावेश करतो. बाजरी, ज्वारी, नाचणीसारखे पदार्थ आपल्याला आहारात तर असतातच पण मक्याचे पदार्थ किंवा पीठ याचा देखील समावेश असतो.(benefits of homemade corn flour)
वाढत्या वजनामुळे किंवा आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेक आहारात बदल करतात. गव्हाच्या पीठाऐवजी मक्याचे पीठ खातात.(best way to make corn flour at home naturally) बाजारातून विकत आणलेल्या पीठात अनेकदा भेसळ असते. ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. पण घरच्या घरी काही सोप्या स्टेप्समध्ये आपण मक्याचे पीठ तयार करु शकतो.
मक्याचे पीठ हे आपल्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. हे फक्त भाकरी, पीठ, पराठे, पिठलं, चिवडा किंवा उपम्या पुरता मर्यादित नसून यापासून आपण बेकरी आयटम्स देखील बनवू शकतो. यात फायबप, व्हिटॅमिन बी आणि अँटीऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते. जे पचन सुधारण्यास, शरीराला ऊर्जा देण्याचे काम करते. घरच्या घरी मक्याचे पीठ कसं बनवायचं पाहूया.
मक्याचे पीठ बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी १ किलो मका घ्यावा लागेल. त्यानंतर पीठ बनवण्यासाठी मक्याचे दाणे व्यवस्थित सोलून घ्या. त्यात कचरा, दगड किंवा धूळ नसेल याची खात्री करा. यानंतर मक्याचे दाणे पाण्याने स्वच्छ धुवा, ज्यामुळे पाण्यातील घाण निघून जाईल. यानंतर कापडावर किंवा ताटात पसरवून उन्हात दोन ते तीन दिवस वाळवून घ्या.
फक्त १० मिनिटांत करा लक्ष्मीनारायण चिवडा! मार्केटसारखी चव, घरचे म्हणतील पुन्हा कर ना..
मका पूर्णपणे सुकल्यानंतर ते मिक्सर ग्राइंडर किंवा घरगुती पिठाच्या गिरणीत लहान भागांमध्ये बारीक करा. जर आपल्याला थोडेसे जाड पीठ हवे असेल तर ते जास्त बारीक करु नका. ते अधूनमधून चाळून घ्या. ज्यामुळे उरलेली भरड आपल्याला पुन्हा बारीक करता येईल. तयार केलेले पीठ पूर्णपणे थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवा. आता हवं तेव्हा आपल्याला मक्याचे पीठ वापरता येईल.
