Join us
Daily Top 2Weekly Top 5

चमचमीत आणि कुरकुरीत भोपळ्याच्या पानांची भजी! ऐकला नसेल तुम्ही हा पदार्थ, कांदा भजीच्या तोडीसतोड चव, पाहा रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2026 17:40 IST

pumpkin leaves recipe: bhoplyachya pananchi bhaji: tea time snacks: भोपळ्याच्या पानांची भजी कशी करायची पाहूया

पावसाळा असो किंवा थंडीचे दिवस गरमागरम भजी आणि चहा म्हणजे भारतीयांसाठी सुखद सोहळाच. भजी म्हटलं की आपल्याला फक्त कांदा भजी, बटाटा भजी किंवा पालक भजी आठवते. पण कधी भोपळ्याच्या पानांची भजी खाल्ली आहे का?.(pumpkin leaves recipe) भला मोठा दिसणारा भोपळा पाहून आपण नाक मुरडतो, पाने निरुपयोगी म्हणून फेकून देतो. पण या पानांपासून आपल्याला कुरकुरीत आणि चविष्ट पकोडे खाता येतील. ग्रामीण भागात, विशेषतः कोकण आणि विदर्भात, ही रेसिपी खूप लोकप्रिय आहे. पाहूयात ही हटके रेसिपी. (bhoplyachya pananchi bhaji)भोपळ्याची पाने केवळ चविष्ट नसून ती आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर असतात. यामध्ये लोह, व्हिटॅमिन सी आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. या पानांची भजी दिसायला साधी असली तरी खाताना ती इतकी कुरकुरीत लागतात की, त्यापुढे कांदा भजीची चवही फिकी पडते. भजी कशी करायचां पाहूया. 

पनीरसोबत चुकूनही खाऊ नका ३ गोष्टी, पोट इतकं दुखतं की गाठावा लागतो थेट दवाखानाच

साहित्य 

भोपळ्याची पाने - ५ ते ६मसूर डाळ - १ कप लसूण पाकळ्या - ४ ते ५आले - १ तुकडाहिरवी मिरची - ४तांदळाचे पीठ - १ चमचाहळद - १ चमचाधने पावडर - १ चमचा गरम मसाला - १ चमचा मीठ - चवीनुसार लाल तिखट -१ चमचा कोथिंबीर - आवश्यकतेनुसार तेल - तळण्यासाठी 

 

कृती 

1. सगळ्यात आधी आपल्याला भोपळ्याच्या पाने स्वच्छ करुन घ्यायला हवी. यानंतर मसूरची डाळ स्वच्छ धुवून भिजत घाला. 

2. आता भिजवलेली मसूर डाळ, लसूण, आले, हिरवी मिरची मिक्सरमध्ये घालून त्याची पेस्ट तयार करा. 

3. वाटलेल्या पेस्टमध्ये तांदळाचे पीठ, हळद, इतर सर्व मसाले, मीठ, कोथिंबीर घाला. चमच्याने ढवळन घ्या. 

4. भोपळ्याच्या पानांना सारण लावून त्याला समोश्यासारखे फोल्ड करा. कढईमध्ये तेल तापवून मंद आचेवर पकोडा तळून घ्या. सॉस किंवा चटणीसोबत आवडीने खा 

English
हिंदी सारांश
Web Title : Crispy Pumpkin Leaf Fritters: A Unique & Delicious Recipe!

Web Summary : Enjoy monsoon or winter with hot fritters. Try pumpkin leaf fritters, a popular Konkan and Vidarbha recipe. These crispy, tasty fritters, rich in iron, vitamin C, and fiber, rival onion fritters in flavor. A must-try snack!
टॅग्स :अन्नपाककृती