Lokmat Sakhi >Food > मोदकाला कळ्या पाडण्याचे टेन्शन विसरा! करा झटपट होणारे पोटली मोदक -स्वादिष्ट आणि दिसतातही सुबक...

मोदकाला कळ्या पाडण्याचे टेन्शन विसरा! करा झटपट होणारे पोटली मोदक -स्वादिष्ट आणि दिसतातही सुबक...

How to make Potli Modak : Potli Modak Recipe : easy potli modak recipe : मोदकांच्या कळ्या पाडता येत नसतील किंवा परफेक्ट कळ्या पाडणं अवघड वाटत असेल तर करा इन्स्टंट 'पोटली मोदक'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2025 15:52 IST2025-08-25T15:30:57+5:302025-08-25T15:52:46+5:30

How to make Potli Modak : Potli Modak Recipe : easy potli modak recipe : मोदकांच्या कळ्या पाडता येत नसतील किंवा परफेक्ट कळ्या पाडणं अवघड वाटत असेल तर करा इन्स्टंट 'पोटली मोदक'

How to make Potli Modak Potli Modak Recipe easy potli modak recipe | मोदकाला कळ्या पाडण्याचे टेन्शन विसरा! करा झटपट होणारे पोटली मोदक -स्वादिष्ट आणि दिसतातही सुबक...

मोदकाला कळ्या पाडण्याचे टेन्शन विसरा! करा झटपट होणारे पोटली मोदक -स्वादिष्ट आणि दिसतातही सुबक...

गणपती बाप्पांच्या आगमनासाठी आता अवघे मोजून काहीच दिवस बाकी आहेत. गणपती बाप्पांचे आगमन झाले की, बाप्पांचे विसर्जन होईपर्यंत घरोघरी बाप्पांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक मोठ्या हौसेने तयार (Potli Modak Recipe) केले जातात. गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण करताना मोदकाचा मान सर्वात मोठा असतो, यासाठीच  बाप्पांचा प्रसाद, नैवेद्य म्हटलं की मोदक तर हवेच... आपल्याकडे पारंपरिक पद्धतीचे उकडीचे किंवा तळणीचे मोदक हमखास (How to make Potli Modak) तयार केले जातात. मोदक खायला जितके चविष्ट लागतात तितकेच ते तयार करणं म्हणजे नाजूक आणि किचकट काम. मोदकांच्या कळ्या पाडणं म्हणजे कलाकुसरच असते( easy potli modak recipe).

अनेक गृहिणींना मोदक करता येत नाही, काहींना तर कळ्या पाडणे म्हणजे अवघड कामचं वाटते. अशा परिस्थितीत, आपण झटपट तयार होणारे पोटली मोदक देखील तयार करू शकतो. पोटली मोदक तयार करताना ना कळ्या पाडण्याची झंझट असते, ना मोदकाला परफेक्ट शेप येण्याचे टेंन्शन.. पण हे पोटली मोदक दिसताना थोडेफार आपल्या पारंपरिक मोदकांसारखेच दिसतात. जर आपल्याला मोदकांच्या कळ्या पाडता येत नसतील किंवा परफेक्ट कळ्या पाडणं अवघड वाटत असेल तर आपण अशा पद्धतीचे सहजसोप्या पद्धतीने करता येतील असे 'पोटली मोदक' झटपट तयार करु शकतो. इन्स्टंट पद्धतीने झटपट पोटली मोदक करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.  

साहित्य :- 

१. साजूक तूप - १ टेबलस्पून
२. खसखस - १ टेबलस्पून
३. सुकं खोबरं - १ कप (किसून घेतलेलं)
४. ड्रायफ्रुटस काप / तुकडे - १/२ कप 
५. जायफळ पूड - १/२ टेबलस्पून 
६. वेलची पूड - १/२ टेबलस्पून 
७. गूळ - १ कप (किसलेला)
८. गव्हाचे पीठ - १/२ कप 
९. मैदा - १/२ कप
१०. पाणी - गरजेनुसार 
११. तेल - तळण्यासाठी 

ना गूळ ना साखर, बाप्पांसाठी करा मखाण्यांचे मोदक! खा मनसोक्त पौष्टिक आणि सण साजरा करा आनंदात...


कृती :- 

१. सगळ्यात आधी एका कढईत थोडे साजूक तूप घेऊन त्यात खसखस घालून ती हलकासा रंग बदलेपर्यंत परतवून घ्यावी. 
२. मग यात किसून घेतलेलं सुकं खोबरं, ड्रायफ्रुट काप, जायफळ पूड, वेलची पूड, किसलेला गूळ असं सगळं मिश्रण घालूंन मोदकांसाठीचे चविष्ट असे सारण तयार करून घ्यावे. हे तयार सारण एका डिशमध्ये काढून थोडे गार करून घ्यावे. 
३. मोदकाची पारी तयार करण्यासाठी एका परातीत थोडे साजूक तूप, गव्हाचे पीठ, मैदा घेऊन गरजेनुसार थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे.

मूग-तूर-हरबरा-कोणती डाळ किती वेळ पाण्यात भिजवून शिजवली तर होत नाही गॅस-पित्ताचा त्रास?

 उकडीच्या मोदकांसाठी गूळखोबऱ्याचं सारण कधी सैल होतं कधी कडक? सारण परफेक्ट करण्यासाठी ५ टिप्स...

४. मळून घेतलेल्या पिठाचे मध्यम आकाराचे छोटे गोळे तयार करून घ्यावेत. हे गोळे थोडेसे पीठ लावून लाटून घ्यावेत. पुरी एवढ्या आकाराची पारी लाटून घ्यावी. 
५. लाटून घेतलेल्या पारीमध्ये तयार मोदकाचे सारण भरून घ्यावे. त्यानंतर या पारीच्या कडांना बोटाने पाणी लावून पारीला बोटांच्या मदतीने आकार देत मोदकाची पोटली तयार करून घ्यावी. 
६. कढईत तेल गरम करत ठेवावे. या गरम तेलात पोटली मोदक सोडून हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत खरपूस तळून घ्यावेत. 

झटपट होणारे खमंग चवीचे गरमागरम तळणीचे मोदक खाण्यासाठी तयार आहेत.

Web Title: How to make Potli Modak Potli Modak Recipe easy potli modak recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.