सकाळच्या किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी किंवा कधी नाश्त्यासाठी काहीतरी झटपट, चविष्ट आणि घरगुती खायचं असेल तर थालीपीठ हा उत्तम पर्याय असतो. पण अनेकदा भाजणी नसल्यामुळे थालीपीठ बनवण्याचा बेत रद्द केला जातो. अशावेळी तुमच्यासाठी एक भन्नाट आणि सोपी रेसिपी म्हणजे भाजणीशिवाय तयार होणारं पोह्याचं थालीपीठ! कमी वेळात, कमी साहित्यामध्ये आणि अगदी झटपट तयार होणारं हे थालीपीठ खायला जितकं खमंग आणि खुसखुशीत आहे, तितकंच पौष्टिकही आहे. पोह्यांपासून बनवल्यामुळे हे हलकं, पचायला सोपं आणि सगळ्यांनाच आवडणारं आहे(How To Make Poha Thalipeeth Recipe).
भाजणीचा अजिबात खटाटोप न करता, अगदी १० मिनिटांत तयार होणारं हे 'पोह्याचं थालीपीठ' चवीला इतकं खमंग लागतं की कोणी ओळखूही शकणार नाही की हे भाजणीचं नाहीये. इतकंच नाही, तर सकाळच्या धावपळीत नाश्त्याला काय बनवायचं? हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला रोजच पडतो. पोहे खाऊन कंटाळा आला असेल, तर नक्की ट्राय (Instant Poha Thalipeeth Recipe) करा 'इन्स्टंट पोह्याचं थालीपीठ'. यासाठी तुम्हाला कोणतीही पूर्वतयारी किंवा भाजणी दळण्याची गरज नाही. घरामध्ये असलेल्या उपलब्ध साध्या साहित्यातून तयार होणारा हा पौष्टिक आणि चविष्ट नाश्ता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. इन्स्टंट पोह्याचं थालीपीठ करण्याची (Poha Thalipeeth Recipe) सुपरईझी रेसिपी पाहूयात...
साहित्य :-
१. पोहे - १ कप
२. गव्हाचं पीठ - १/२ कप
३. बेसन - १/२ कप
४. मीठ - चवीनुसार
६. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)
७. कोथिंबीर - १/२ कप (बारीक चिरलेली)
८. हिरव्या मिरच्या - २ ते ३ (बारीक चिरलेल्या)
९. धणेजिरे पूड - १ टेबलस्पून
१०. हळद - १ टेबलस्पून
११. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून
१२. हिंग - चिमूटभर
१३. पांढरे तीळ - १ टेबलस्पून
१४. कसुरी मेथी - १ टेबलस्पून
१५. तेल - ३ ते ४ टेबलस्पून
कच्चा कांदा आरोग्यासाठी 'वरदान' की आजारांना 'आमंत्रण'? रिसर्च सांगतो कुणी खावा कुणी टाळावा...
घरात भाजीसाठी काहीच नाही ? मग करा झटपट 'मसाला चपाती' - १ नाही चांगल्या ४ चपात्या खाल नक्की...
कृती :-
१. एका मोठ्या भांड्यात पोहे घेऊन ते पाण्याने २ ते ३ वेळा स्वच्छ धुवून घ्यावेत. मग गरजेनुसार थोडं पाणी घालून वर झाकण ठेवून पोहे १० ते १५ मिनिटांसाठी किंचित पाण्यांत भिजत ठेवावेत.
२. १० मिनिटांनंतर हे पोहे हाताने हलकेच दाब देत कुस्करून त्याचा लगदा करून घ्यावा.
३. आता या पोह्यांच्या मिश्रणात गव्हाचं पीठ, बेसन, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, धणेजिरे पूड, हळद, लाल तिखट मसाला, हिंग, पांढरे तीळ, कसुरी मेथी घालावी.
Gudhi Padwa 2026 : गुढीपाडव्याला करा रेशमासारखं मऊ श्रीखंड! परफेक्ट श्रीखंड करण्यासाठी ९ टिप्स...
४. त्यानंतर यात गरजेनुसार थोडं - थोडं पाणी घालून थालीपिठासाठीचे पीठ मळून घ्यावं.
५. ओला रुमाल किंवा प्लॅस्टिकवर या तयार पिठाचे गोळे घेऊन थालीपीठ थापून घ्यावं.
६. पॅनवर तेल सोडून हे थालीपीठ दोन्ही बाजुंनी खमंग, खुसखुशीत होईपर्यंत खरपूस भाजून घ्यावं.
भाजणीशिवाय देखील इन्स्टंट तयार होणारं खमंग, खुसखुशीत पोह्याचं थालीपीठ आपण दही, लोणचं किंवा हिरवी चटणी, सॉस सोबत देखील खाऊ शकता.
