सकाळच्या नाश्त्यात अनेकदा पोहे आवडीने आपण करतो परंतु, कधी पोहे गचके होतात तर कधी कडक. (Healthy breakfast for children) पोह्यांना व्यवस्थित भिजवले नाही तर त्याचा अगदी लगदाच होतो.(Indian toddler breakfast recipes) अशावेळी नेमके काय करावं सुचत नाही म्हणून आपण ते टाकून देतो. सकाळच्या नाश्त्यात पौष्टिक पदार्थ असायला हवे असं नेहमीच म्हटलं जातं.(Poha snacks for toddlers) त्यासाठी पोहे, उपमा, शिऱ्यासारखे पदार्थ हमखास बनवून खाल्ले जातात. (Morning breakfast idea for kids)
आठवड्यातील एक तरी दिवस असा असतो जेव्हा काही तरी स्पेशल नाश्ता असावा असं प्रत्येकाला वाटतं.(Nutritious snacks for children) आपल्याला देखील तेच तेच पदार्थ बनवून वैताग येतो. अशावेळी कमी साहित्यात चवदार आणि मुलांच्या आवडीची रेसिपी करायची असेल तर पोह्यांचे कटलेट ट्राय करु शकता. चिमुकल्यांसाठी हेल्दी आणि टेस्टी नाश्ता कसा बनवायचा पाहूया रेसिपी. (No-fry snack for toddlers)
अळूवडी खाताना घसा खवखवतो? भाजी आणि वड्यांचे अळूची पाने ओळखण्याची सोपी ट्रिक, अळूवड्या होतील खुसखुशीत
साहित्य
भिजवलेले पोहे - १ वाटी
उकडलेला मटार - १ वाटी
किसलेला गाजर - १ वाटी
किसलेले आले - १ चमचा
कोथिंबीर - आवश्यकतेनुसार
तीळ - २ चमचे
भाजलेलं डाळीचे पीठ - १ वाटी
हळद - १ चमचा
धने जिरे पूड - १ चमचा
गरम मसाला - १ चमचा
मीठ - चवीनुसार
तेल
कृती
1. सगळ्यात आधी एका वाटीत पोहे घेऊन त्यात थोडे पाणी घालून भिजत ठेवा.
2. आता उकडलेला वटाणा चमच्याने मॅश करुन घ्या. भिजवलेल्या पोह्यांमध्ये मॅश केलेला वटाणा, गाजर, आले, कोथिंबीर घाला.
3. यामध्ये तीळ, हळद, धने-जिरे पूड, गरम मसाला, मीठ आणि भाजलेलं डाळीचे पीठ घालून चांगले मिक्स करा.
4. मिश्रणाचे पीठ तयार होईल. आता कटलेटच्या मोल्डमध्ये तयार सारण भरुन कटलेट बनवा.
5. पॅनवर तेल गरम करुन तव्यावर शॅलो फ्राय करा. मुलांना आवडतील असे कुरकुरीत- चविष्ट पोह्यांचे कटलेट तयार होतील.