सणसमारंभ असले की घरात हमखास पुऱ्या बनवल्या जातात.(Urad dal puri recipe) पण अनेकदा आपल्याला सहजच पुऱ्या खाण्याची इच्छा होते. अनेक लोक मैदा, गव्हाच्या पुऱ्या खाणं टाळतात. पुऱ्या तळताना अनेकदा खूप तेल पितात.(Dal puri Indian recipe) ज्यामुळे आपल्याला अपचनाचा त्रास देखील होतो. पण आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला हेल्दी पदार्थ जास्त प्रमाणात खायला आवडतात.(Healthy puri recipe) सध्या अनेकांचा ऑइल फ्री किंवा पौष्टिक पदार्थ खाण्याकडे कल आहे. जर आपल्याला गहू किंवा मैद्याचा वापर करुन पुऱ्या बनवायच्या नसतील तर उडीदाच्या डाळीपासून पुऱ्या करु शकतो. (Oil-free puri)
उडीदाची डाळ ही प्रोटीन, फायबर, आयर्न आणि मिनरल्सने परिपूर्ण असते. शरीराला ऊर्जा देते, तसेच पचनसंस्था देखील सुधारते. यामुळे आपले स्नायू बळकट होतात. उडीदाच्या डाळीपासून पौष्टिक आणि ऑईल फ्री पुरी कशी करायची पाहूया रेसिपी.
डाळ-तांदूळ न भिजवता, न आंबवता; १५ मिनिटांत करा काकडी इडली, कापसाहून मऊ आणि हलकी- पाहा रेसिपी
साहित्य
उडीदाची डाळ - १/३ कप
ताक - १/३ कप
पातळ पोहे - १/४ कप
रवा - १/४ कप
गव्हाचे पीठ - १ कप
मिरची - १ ते २
कोथिंबीर - आवश्यकतेनुसार
ओवा- १ चमचा
तीळ - १ चमचा
मीठ- चवीनुसार
कलोंजी - १ चमचा
तेल - तळण्यासाठी
पाणी - आवश्यकतेनुसार
कृती
1. सगळ्यात आधी उडीदाची डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यात पाणी घालून २ ते ३ तास भिजत ठेवा. आता मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली उडीदाची डाळ, ताक आणि भिजवलेले पोहे घालून पेस्ट तयार करा.
2. या पेस्टला एका बाऊलमध्ये घेऊन त्यात रवा घाला. चमच्याने चांगले मिक्स करा. त्यात गव्हाचे पीठ, बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर, ओवा, मीठ, तीळ आणि कलोंजी घाला. सर्व साहित्य एकजीव करुन कणिक मळून घ्या.
3. तयार कणिक १० ते १५ मिनिटे झाकूण ठेवा. थोड्या वेळाने पीठाचे गोळे करा. पुऱ्या लाटून घ्या. तेल गरम करुन मंद आचेवर पुऱ्या तळा. तयार होतील टम्म फुगलेल्या उडीदाच्या डाळीच्या कमी तेलकट पुऱ्या.
