ऋतूनुसार येणाऱ्या फळांचा आपल्या रोजच्या आहारात आवर्जून समावेश करायलाच हवा. पावसाळ्यात येणाऱ्या फळांपैकी लालचुटुक लिची ही सगळ्यांच्याच आवडीची. इवलेसे लिची (Lychee Jelly) हे चविष्ट व रसाळ फळ फक्त चवीलाच नव्हे तर आरोग्यालाही पोषक असते. लिची मधील अँटीऑक्सिडंट्स, फायबर्स आणि नैसर्गिक साखर त्वचा, पचन व इम्युनिटीसाठी फायदेशीर मानले जातात. सध्या बाजारांत फळांच्या ठेल्यावर लालचुटुक आणि चवीला गोडसर (How To Make Perfect Lichee Jelly At Home) असणारी लिची फार मोठ्या प्रमाणांत विकायला असते. लिची पाहून विकत घेण्याचा मोह कुणालाच आवरता येत नाही(Making Lychee Jelly at Home).
लिचीचे घड विकत आणल्यावर आपण लिची तर खातोच, पण लिचीच्या गराचे वेगवेगळे पदार्थ देखील तयार करतो. लिचीमधील नैसर्गिक गोडवा आणि रसाळपणा यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या डेझर्टमध्ये देखील याचा वापर केला जातो. लिचीच्या गरापासून आपण घरातील बच्चेकंपनीसाठी खास जेली तयार करु शकतो. बाजारातील आर्टिफिशियल जेलीला पर्याय म्हणून आपण घरच्याघरीच ताज्या लिचीच्या गरापासून जेली कशी तयार करायची ते पाहूयात.
साहित्य :-
१. लिची - १ कप लिचीचा गर (बिया काढून घेतलेला)
२. साखर - चवीनुसार
३. चीन ग्रास पावडर - १/२ टेबलस्पून
४. बीटाचा रस - २ ते ३ टेबलस्पून
५. पाणी - ३ ते ४ टेबलस्पून
न वाफवता करा ८ दिवस टिकणारी कुरकुरीत कोथिंबीर वडी, करायला सोपी चवीला उत्तम - पाहा रेसिपी...
लालचुटूक टोमॅटोचे भरीत एकदा खाऊन पाहा, चव लय भारी! पाहा टोमॅटोच्या भरीताची मस्त रेसिपी...
कृती :-
१. सगळ्यांतआधी लिची स्वच्छ धुवून - पुसून त्याची सालं काढून घ्यावीत. त्यानंतर लिचीच्या बिया वेगळ्या काढून फक्त गर एका बाऊलमध्ये काढून घ्यावा.
२. आता हा लिचीचा गर मिक्सरच्या भांड्यात घालूंन त्याची पातळ पेस्ट तयार करून घ्यावी.
३. गॅसच्या मंद आचेवर एक भांडं ठेवून त्यात मिक्सरमध्ये वाटून घेतलेला लिचीचा गर ओतावा, चवीनुसार साखर घालावी.
बटाटे उकडताना फुटतात, लगदा होतो? ८ टिप्स - बटाटे उकडण्याची परफेक्ट पद्धत, काम होईल झटपट...
४. साखर संपूर्णपणे वितळवून घ्यावी. मग या मिश्रणात चीन ग्रास पावडर व थोडे पाणी घालावे. हे सगळे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. मिश्रण थोडे आटवून घ्यावे, मिश्रण थोडे घट्ट व जेली सारखे झाल्यावर लगेच ते चॉकलेट मोल्डमध्ये भरुन घ्यावे.
५. चॉकलेटच्या साच्यांमध्ये हे मिश्रण अर्धेच भरून घ्यावे, मग उरलेल्या मिश्रणात बीटाचा रस घालून मिश्रण हलक्या लाल रंगाचे करावे नंतर अर्ध्या भरलेल्या साच्यांमध्ये हे मिश्रण ओतावे. ३ ते ४ तास फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यावे. लिची जेली खाण्यासाठी तयार आहे.
पांढरीशुभ्र आणि लालचुटुक अशा दोन्ही रंगांचे मिश्रण असलेली लिची जेली खाण्यासाठी तयार आहे.