Lokmat Sakhi >Food > शेंगदाण्याचे दूध करून 'असं' लावा विरजण, वजन राहिल नियंत्रणात, पोटाला मिळेल थंडावा, पाहा रेसिपी

शेंगदाण्याचे दूध करून 'असं' लावा विरजण, वजन राहिल नियंत्रणात, पोटाला मिळेल थंडावा, पाहा रेसिपी

Peanut milk curd recipe: Vegan curd for weight loss: How to make peanut curd: शेंगदाण्याचे दूध कसे काढायचे त्याचे दही कसं तयार करायचं पाहूया सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2025 18:05 IST2025-05-25T18:00:00+5:302025-05-25T18:05:01+5:30

Peanut milk curd recipe: Vegan curd for weight loss: How to make peanut curd: शेंगदाण्याचे दूध कसे काढायचे त्याचे दही कसं तयार करायचं पाहूया सोपी रेसिपी

how to make peanut milk curd at home Vegan Curd for weight loss cool stomach see the recipe | शेंगदाण्याचे दूध करून 'असं' लावा विरजण, वजन राहिल नियंत्रणात, पोटाला मिळेल थंडावा, पाहा रेसिपी

शेंगदाण्याचे दूध करून 'असं' लावा विरजण, वजन राहिल नियंत्रणात, पोटाला मिळेल थंडावा, पाहा रेसिपी

दही हे आपल्या आरोग्यासाठी सगळ्यात चांगला पदार्थ आहे.(Peanut milk curd recipe) याचे नियमितपणे सेवन केल्यास आपल्याला पोटाला आराम मिळतो. तसेच पचनसंस्था देखील सुरळीत राहते.(Vegan curd for weight loss) त्यासाठी आहारतज्ज्ञ आपल्याला दुपारच्या जेवणात दही खाण्याचा सल्ला देतात.(How to make peanut curd) परंतु, अनेकदा दही हे आपल्याला बाधत. यामुळे सर्दी-खोकला होण्याची शक्यता अधिक असते. (Homemade vegan curd)
आपल्या दह्याचे विरजण लावायचे असेल पण ते थोड वेगळ्या पद्धतीने मग शेंगदाण्याच्या दुधाचे विरजण ट्राय करुन पाहा. (Cool stomach vegan curd)शेंगदाण्याचे दूध हे प्लांट बेस नसते त्यामुळे हा पर्याय खूप उपयुक्त ठरतो. जे लोक लैक्टोज इंटॉलरन्स किंवा वेगन आहार पाळतात.(Step-by-step peanut milk curd at home) त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहे.यामध्ये कॅलरीज कमी असतात ज्यामुळे आपले वजन सहज कमी होईल.   शेंगदाण्याचे दूध कसे काढायचे त्याचे दही कसं तयार करायचं पाहूया सोपी रेसिपी (Gut-cooling vegan curd recipe)

अळूवडी खाताना घसा खवखवतो? भाजी आणि वड्यांचे अळूची पाने ओळखण्याची सोपी ट्रिक, अळूवड्या होतील खुसखुशीत

साहित्य 
शेंगदाणे - १ कप 
पाणी - १ ते दीड कप 
मीठ - अर्धा चमचा 
हिरवी मिरची - ६ ते ८ 


 
कृती 

1. सगळ्यात आधी शेंगदाणे स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. 

2. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले शेंगदाणे आणि दीड कप पाणी घालून वाटून घ्या. आता एका भांड्यावर जाळी ठेवून त्यावर पांढरा रुमाल पसरवा. 

3. रुमालात मिक्सरमध्ये वाटलेले शेंगदाणे पेस्ट गाळून घ्या. दूध निघाल्यानंतर गॅसवर १५ ते २० मिनिटे उकळवून घ्या. चमच्याने सारखे ढवळत रहा. हळूहळू ते घट्ट होईल. 

4. आता १० मिनिटांनी यामध्ये मीठ घालून थंड होण्यास ठेवा. ज्या भांड्यात विरजण लावायचे आहे त्यामध्ये तयार मिश्रण काढून घ्या. 

5. हिरव्या मिरच्यांची देठ त्यामध्ये घालून काही तास सेट होण्यास ठेवा. तयार होईल शेंगदाण्याचे दही. 
 

Web Title: how to make peanut milk curd at home Vegan Curd for weight loss cool stomach see the recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.