Join us
Daily Top 2Weekly Top 5

फक्त १० मिनिटांत करा ३० दिवस टिकणारी शेंगदाणा खोबरे चटणी, ना वाटण-ना फोडणीची झंझट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2026 12:30 IST

Peanut coconut chutney: Instant chutney recipe: No grind chutney: इन्स्टंट चटणी कशी बनवायची, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.

भारतीय जेवणात चटणीला एक वेगळेच महत्त्व आहे. मग ते वरण-भात असो, पोळी-भाजी असो किंवा थालीपीठ, तोंडी लावायला चटणी असेल तर जेवणाची रंगत द्विगुणित होते.(Peanut coconut chutney) पण रोजच्या धावपळीच्या जीवनात रोज ताजी चटणी करणं शक्य नसते. अशा वेळी आपण अशा पदार्थाच्या शोधात असतो जो चविष्ट तर असेलच, पण जो दीर्घकाळ टिकू शकेल. (Instant chutney recipe)शेंगदाणा आणि सुके खोबरे हे भारतीय स्वयंपाकघरातील दोन महत्त्वाचे घटक आहेत. ही चटणी केवळ सुकी चटणी म्हणून वापरता येते असे नाही, तर गरज पडल्यास यात थोडे पाणी आणि दही मिसळून तुम्ही याची 'इन्स्टंट ओली चटणी' देखील बनवू शकता.(No grind chutney) ही चटणी बनवून आपण काचेच्या बरणीत भरून ठेवली, तर महिनाभर ती खराब होत नाही. ही इन्स्टंट चटणी कशी बनवायची, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. 

साधी साडी- लूक रॉयल! कस्टमाइज्ड स्टोन वर्क ब्लाऊजचे एकापेक्षा एक भारी पॅटर्न

साहित्य 

शेंगदाणे - १/२ कप कढीपत्ता भाजलेली पांढरी डाळ- १ कपलाल सुक्या मिरच्या - ५चिंच - १ छोटा तुकडामीठ - १ चमचा तेल - २ चमचे मोहरी - १ चमचा उडीद डाळ - १ चमचा मिरची पावडर - अर्धा चमचा 

वाटी इडली करा फक्त १५ मिनिटांत, ना इडली पात्राची गरज ना स्टँडची-जाळीदार मऊ इडली झटपट

नारळाच्या चटणीसाठी साहित्य 

तेल - १ चमचा चिरलेल्या मिरच्या - ३भाजलेली चणाडाळ - १/२ कप किसलेला सुका नारळ - १ कप चिंच - १ छोटा तुकडा मीठ - १ चमचा तेल - २ चमचे मोहरी - १ चमचाउडीद डाळ - १ चमचासुक्या लाल मिरच्या - २ कढीपत्ता

कृती 

1. सगळ्यात आधी एका पॅनमध्ये अर्धा कप शेंगदाणा कुरकुरीत होईपर्यंत कोरडे भाजून घ्या. नंतर १ कप चणाडाळ घाला. कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. त्यात सुकलेल्या लाल मिरच्या आणि चिंचेचा छोटा तुकडा घाला. वाफ येईपर्यंत मिनिटे परतून घ्या. थंड झाल्यानंतर मीठ घालून मिक्सर ग्राइंडरमध्ये वाटून घ्या. 

2. आता दुसऱ्या पॅनमध्ये २ चमचे तेल गरम करा. त्यात मोहरी, उडीद डाळ, सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्ता घाला. मिरची पावडर घाला आणि मंद आचेवर भाजून घ्या. 

3. त्यात शेंगदाणे पावडर घाला आणि चांगले मिसळा. तयार मिश्रण हवाबंद डब्यात ठेवा. महिनाभर ही चटणी खाऊ शकता. 

4. सुक्या नारळाच्या चटणीसाठी सर्व साहित्य तेलावर परतवून घ्या. नंतर मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्या. तेल गरम करुन त्यात मोहरी, उडीद डाळ, सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्ता घाला. मिरची पावडर घाला आणि मंद आचेवर भाजून घ्या. 

5. तयार झालेली चटणी एका ताटात पसरवून पूर्णपणे थंड होऊ द्या. त्यानंतर ती एका हवावंद डब्यात किंवा काचेच्या बरणीत भरून ठेवा. ही चटणी फ्रीजबाहेर १५-२० दिवस आणि फ्रीजमध्ये ठेवली तर १ ते २ महिने आरामात टिकते. यात थोडे अमचूर पावडर किंवा चिमूटभर साखर देखील घालू शकता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Make 30-day peanut-coconut chutney in 10 minutes, no grinding!

Web Summary : Enjoy flavorful chutney easily! This recipe creates a long-lasting peanut-coconut chutney without grinding or tempering. Make a dry or instant wet version. Store in an airtight container for a month of deliciousness.
टॅग्स :अन्नपाककृती