'पराठा' हा असा पदार्थ आहे की जो आपण सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही खाऊ शकतो. रोजच्या चपातीचा कंटाळा आला की आपण काहीतरी वेगळं म्हणून पराठा (How to make Paratha Masala Powder At Home) करतो. पराठ्यांचे अनेक प्रकार असतात. काहीवेळा आपण भाज्या चिरुन त्या कणकेत मिक्स करुन पराठे करतो तर कधी स्टफिंग बनवून ते कणकेत भरुन त्याचे पराठे करतो. अशा अनेक पद्धतींनी पराठे तयार करता येतात(Homemade Dry Masala Powder For Paratha).
वेगवेगळ्या पद्धतींनी पराठ्यांचे अनेक प्रकार तयार करता येत असले तरीही, ते चवीला स्वादिष्ट असणे गरजेचे असते. पराठे हा अगदी झटपट होणारा पदार्थ असला तरीही काहीवेळा पराठ्यांची चव पाहिजे तशी लागत नाही. अशावेळी ते पराठे आवडीने खाल्ले जात नाही. यासाठीच आपण घरच्याघरी पटकन तयार होणारा आणि दीर्घकाळ टिकणारा पराठ्यांसाठीचा मसाला तयार करुन ठेवू शकतो. हा चिमूटभर मसाला पराठ्यांच्या स्टफिंगमध्ये घातला तर पराठे टेस्टी लागतात. पराठे अधिक स्वादिष्ट (Tips To Make Masala Mix For Tasty Paratha) होण्यासाठी हा मसाला कसा तयार करायचा त्याची रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. जिरे - १ टेबलस्पून
२. धणे - १ टेबलस्पून
३. बडीशेप - १ टेबलस्पून
४. ओवा - १ टेबलस्पून
५. काळीमिरी दाणे -१/२ टेबलस्पून
६. लवंग काड्या - ५ ते ६ टेबलस्पून
७. कसुरी मेथी - १ टेबलस्पून
८. आमचूर पावडर - १ टेबलस्पून
९. सैंधव मीठ - १ टेबलस्पून
१०. साधे मीठ - १ टेबलस्पून
११. लाल सुक्या मिरच्या - ४ सुक्या मिरच्या
१२. ओरेगॅनो - १ टेबलस्पून
१३. हिंग - १/२ टेबलस्पून
१४. कडीपत्ता - ४ ते ५ कडीपत्त्याची पाने
१५. काश्मिरी लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून
ज्वारीच्या भाकरीला द्या थोडा ट्विस्ट आणि करा झटपट मसाला फुलका रोटी - करायला सोपी चवीला अप्रतिम!
नॉनस्टिक तवा नसेल तर, नेहमीच्या तव्याला करा इन्स्टंट पद्धतीने नॉनस्टिक! स्वयंपाक होईल झटपट...
कृती :-
१. सगळ्यांतआधी एक पॅन घेऊन तो गॅसच्या मध्यम आचेवर ठेवून गरम करून घ्यावा.
२. आता या गरम पॅनमध्ये, जिरे, धणे, बडीशेप, लाल सुक्या मिरच्या घालून सगळे जिन्नस एकत्रित हलकेच भाजून घ्यावेत.
३. हे तिन्ही जिन्नस हलकेच भाजून झाल्यावर त्यात ओवा, लवंग काड्या, काळीमिरी दाणे, कडीपत्ता, कसुरी मेथी, घालावी. त्यानंतर या मिश्रणात काश्मिरी लाल मिरची पावडर घालावी. हे सगळे जिन्नस कोरडे भाजून झाल्यानंतर थोडे थंड होण्यासाठी एका मोठ्या डिशमध्ये काढून घ्यावेत.
शिळ्या भाताचा करा मस्त मऊ हलका ढोकळा, फोडणीच्या भातापेक्षा भारी आणि होतो झटपट...
४. आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यात सगळे कोरडे भाजून घेतलेले जिन्नस ओतून घ्यावेत. हे सगळे मिश्रण मिक्सरमधून हलकेच फिरवून घेऊन त्याची थोडी जाडसर पूड तयार करून घ्यावी.
५. मिक्सरमध्ये वाटून घेतलेली ही तयार पूड एका डिशमध्ये काढून त्यात ओरेगॅनो, आमचूर पावडर, सैंधव मीठ, साधे मीठ, हिंग घालून सगळे जिन्नस चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावेत.
आपला पराठा मसाला तयार आहे, हा तयार पराठा मसाला एका हवाबंद डब्यांत भरून स्टोअर करून ठेवावा. कोणत्याही प्रकारचा पराठा तयार करतांना आपणं त्यात हा पराठा मसाला घातला तर त्या पराठ्याची चव दुपटीने वाढते.