Lokmat Sakhi >Food > ना लाटण्याची झंझट ना कणिक मळण्याचं टेंशन, मोजून १० मिनिटांत पराठे करण्याची एक सोपी ट्रिक

ना लाटण्याची झंझट ना कणिक मळण्याचं टेंशन, मोजून १० मिनिटांत पराठे करण्याची एक सोपी ट्रिक

easy paratha recipe: quick paratha without rolling pin: paratha in 10 minutes:ही सोपी ट्रिक वापरुन आपण न लाटता, कणिक मळताना झटपट होईल असा पराठा तयार करु शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2025 15:30 IST2025-10-01T15:30:12+5:302025-10-01T15:30:46+5:30

easy paratha recipe: quick paratha without rolling pin: paratha in 10 minutes:ही सोपी ट्रिक वापरुन आपण न लाटता, कणिक मळताना झटपट होईल असा पराठा तयार करु शकतो.

how to make paratha in 10 minutes without rolling pin easy paratha recipe without kneading dough quick Indian paratha recipe for busy mornings | ना लाटण्याची झंझट ना कणिक मळण्याचं टेंशन, मोजून १० मिनिटांत पराठे करण्याची एक सोपी ट्रिक

ना लाटण्याची झंझट ना कणिक मळण्याचं टेंशन, मोजून १० मिनिटांत पराठे करण्याची एक सोपी ट्रिक

सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यापासून ते रात्री जेवणापर्यंत पराठा हा कधीही खाल्ला जातो. पराठा म्हटलं की सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ.(easy paratha recipe) आलू पराठ्यासह विविध भाज्या किंवा मसाले घालून पराठा तयार केला जातो. पण पराठा म्हटलं की, आपल्याला त्यानंतर होणारा पसारा आवरण्याचं टेन्शन येतं. बटाटे किंवा भाज्या उकडवा, त्याचं स्टफिंग तयार करा.(quick paratha without rolling pin) कणिक मळा, त्याचे गोळे करून ते व्यवस्थित स्टफ करा.(instant paratha recipe) इतकं करुन सुद्धा अनेकदा पराठा फसतो किंवा तो व्यवस्थित बनत नाही.(simple paratha hack) लाटताना तो तुटतो त्यामुळे आपल्याला बनवताना वैताग येतो. पण ही सोपी ट्रिक वापरुन आपण न लाटता, कणिक मळताना झटपट होईल असा पराठा तयार करु शकतो. हा पराठा कसा बनवायचा पाहूया. (paratha without kneading dough)

फरसबीची भाजी आवडत नाही? मग करा चटणी, झटपट होईल- चवही जबरदस्त

साहित्य 
गव्हाचे पीठ - दीड कप 
सैंधव मीठ - अर्धा चमचा 
साखर - आवश्यकतेनुसार 
चिली फ्लेक्स - १ चमचा 
लसूण - २ चमचे 
बटर - १ चमचा 
बारीक चिरलेली कोथिंबीर 


कृती 

1. सगळ्यात आधी आपल्याला एका मोठ्या भांड्यात पीठ, मीठ, साखर आणि चिली फ्लेक्स घालून सर्व कोरडे साहित्य एकत्र करावं लागेल. त्यात किसलेला लसूण आणि १ चमचा बटर घालून मिक्स करा. आता यात पीठाइतके पाणी घाला. गुठळ्या होऊ नये म्हणून एकाच वेळी पाणी घालून नका. पीठाचे जाडसर बॅटर तयार करा. 

2. बॅटर हे जास्त जाडसर किंवा पातळ नसावे. ज्यामुळे ते तव्यावर सहज पसरते. गुठळ्यांमुळे पराठे फाटतात किंवा व्यवस्थित पसरत नाही. पराठा किंवा डोसा बनवताना पॅनचे तापमान अधिक महत्त्वाचे आहे. त्यासाठी नॉन-स्टिक पॅन घ्या. त्यावर दोन थेंब तेल घाला आणि पॅन टिश्यू पेपरने पुसून घ्या. हे तेल फक्त पॅनला ग्रीस करण्यासाठी वापरायला हवं. ज्यामुळे पराठा चिकटणार नाही. पॅन थोडा गरम होऊ द्या. ज्यामुळे पराठा व्यवस्थित बनेल. 

3. हलक्या गरम झालेल्या तव्यावर पीठ ओता आणि गोलाकार पॅनमध्ये पसरवा. ज्यामध्ये आपण डोसा बनवतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला बनवावा लागेल. एका बाजूने व्यवस्थित भाजल्यानंतर बटर किंवा तूप लावा आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजा. 

Web Title : आसान पराठा रेसिपी: झटपट, बिना गूंधे, 10 मिनट में नाश्ता।

Web Summary : बिना गूंधे या बेले झटपट पराठे बनाएं! यह आसान बैटर-आधारित रेसिपी आसानी से उपलब्ध सामग्री का उपयोग करती है। बैटर मिलाएं, डोसे की तरह पैन पर फैलाएं, सुनहरा होने तक पकाएं।

Web Title : Easy Paratha Recipe: Quick, no kneading, 10-minute breakfast trick.

Web Summary : Make parathas quickly without kneading or rolling! This simple batter-based recipe uses readily available ingredients. Mix batter, spread on a pan like dosa, cook till golden.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.