नुसतं 'पाणीपुरी' म्हटलं की, घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतंच...पण बाजारातून विकत आणलेल्या पुऱ्या अनेकदा कडक, मऊ झालेल्या किंवा तेलकट असतात. त्यामुळे घरच्याघरीच कुरकुरीत, टम्म फुगलेल्या पाणीपुरीच्या पुऱ्या तयार करता आल्या तर मज्जा काही औरच! खास गोष्ट म्हणजे या पुऱ्या बनवण्यासाठी फार साहित्याची गरज नसते - फक्त वाटीभर रवा आणि काही सोप्या टिप्स वापरल्या तर अगदी विकत सारख्याच हलक्या, खुसखुशीत आणि सुंदर फुगलेल्या पुऱ्या काहिओ मिनिटांत तयार होतात. पण अनेकदा बाहेरची पाणीपुरी खाताना आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी वाटते. मग घरी प्रयत्न केला तर पुऱ्या मऊ पडतात किंवा फुगत नाहीत(How to make panipuri recipe).
पण आता टेन्शन नको! फक्त एक वाटी रवा वापरून आपण देखील घरच्याघरीच गाड्यावर मिळते अगदी तशीच टम्म फुगलेली, कुरकुरीत पुरी तयार करु शकतो. पाणीपुरीची खरी मजा ही त्या पुरीच्या कुरकुरीतपणातच असते. पाणीपुरीच्या पुऱ्या विकत आणण्यापेक्षा त्या स्वतःच्या हाताने बनवण्याचा आनंद काही वेगळाच असतो. वाटीभर रव्यापासून (Panipuri ki puri recipe) फारसे कष्ट न घेता, कमी वेळात, मोजक्याच खर्चात ढीगभर (panipuri puris at home) पुऱ्या कशा तयार करायच्या याची सिक्रेट रेसिपी पाहूयात...
साहित्य :-
१. बारीक रवा - १ कप २. गव्हाचे पीठ - १ कप ३. बेकिंग सोडा - १/४ टेबलस्पून ४. मीठ - चवीनुसार५. पाणी - गरजेनुसार६. तेल - तळण्यासाठी
वाटल्या तांदळाची बटाटा भजी, ‘अशी’ कुरकुरीत भजी तुम्ही कधी खाल्ली नसतील, पाहा खमंग रेसिपी...
ना तंदूर, ना ओव्हन! प्रेशरकुकरमध्ये करा अस्सल ढाबा स्टाईल तंदुरी रोटी - मऊ, कुरकुरीत...
कृती :-
१. एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यात बारीक रवा ओतून तो हलकेच, मिक्सर चालू - बंद करून थोडी जाडसर अशी भरड होईल इतका वाटून घ्यावा. २. आता मिक्सरमध्ये वाटून घेतलेली रव्याची जाडसर भरड एका बाऊलमध्ये ओतून त्यात गव्हाचे पीठ, बेकिंग सोडा आणि चवीनुसार मीठ घालावे. ३. मग गरजेनुसार थोडं - थोडं पाणी घालून चपातीप्रमाणेच पीठ मळून घ्यावे.
परफेक्ट उडपी स्टाईल उत्तपा करण्याची खास ट्रिक! अण्णाच्या गाडीवर मिळतो त्याहूनही भारी...
४. मळून घेतलेलं पीठ २ ते ३ तास झाकून व्यवस्थित फुलवून घ्यावे. ५. ३ तासांनंतर या फुललेल्या पिठाचे छोटे - छोटे गोळे करून ते छोट्या आकारात गोलाकार लाटून घ्यावे. ६. कढईत तेल व्यवस्थित गरम करुन, गॅसची आच हाय फ्लेमवर ठेवून या पुऱ्या तेलात सोडून टम्म फुगेपर्यंत आणि हलकासा गोल्डन - ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्याव्यात.
वाटीभर रव्याच्या घरच्याघरीच करता येतील अशा टम्म फुगलेल्या पाणीपुरीच्या पुऱ्या नक्की करुन पाहाच.
Web Summary : Craving Pani Puri? Make crispy, puffed puris at home with semolina and wheat flour. This recipe is easy, hygienic, and yields perfectly puffed, delicious puris. Forget store-bought ones!
Web Summary : पानी पुरी खाने का मन है? सूजी और गेहूं के आटे से घर पर बनाएं कुरकुरी और फूली हुई पूरियां। यह रेसिपी आसान, स्वच्छ और स्वादिष्ट पूरियां देती है। बाजार से खरीदने की ज़रूरत नहीं!