भारतीय जेवण हे कांदा-लसणाशिवाय पूर्ण होत नाही.(paneer capsicum masala) यामुळे पदार्थाची चव वाढते. स्वयंपाकघरात कांदा-लसणाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.(no onion no garlic curry) पण अनेकदा धार्मिक कार्यात किंवा गणपतीच्या वेळी कांदा लसूण खाणे वर्ज्य मानले जाते.(paneer recipes without onion garlic) पण अशावेळी भाजी चविष्ट कशी करायची असा प्रश्न आपल्यासमोर उभा राहातो. पनीर सिमला मिरची मसाला ही भाजी कराताना कांदा-लसणाचा वापर हमखास केला जातो.(restaurant style paneer masala) याविषयी भाजीला चव येत नाही. हॉटेलमध्ये मिळणारी पनीर-सिमला मिरची भाजी आपल्यालाही कांदा-लसणाशिवाय बनवायाची असेल तर पाहा सोपी कृती. (quick paneer recipes)
पुरी-भजी, समोसे खाल्ले तरी वाढणार नाही कोलेस्टेरॉल! 'या' तेलात तळा, तब्येत राहील एकदम फिट
साहित्य
दही - १ वाटी कसुरी मेथी - १ चमचा लाल तिखट - १ चमचा हळद - १ चमचा धने पावडर - १ चमचा मीठ - चवीनुसार पनीरचे तुकडे - १ कपसिमला मिरचीचे तुकडे - १ कप तेल - १ मोठा चमचाखडा मसाला तमालपत्रटोमॅटो प्युरी - १ वाटी गरम पाणीफ्रेश क्रीम- १ वाटी
कृती
1. सगळ्यात आधी पनीरचे आणि सिमला मिरचीचे मोठ्या आकारात तुकडे करुन घ्या. आता एका बाऊलमध्ये दही, कसुरी मेथी, लाल तिखट, हळद, धने पावडर, मीठ, पनीरचे तुकडे आणि सिमला मिरचीचे तुकडे घालून सगळं साहित्य एकजीव करा. १५ ते २० मिनिटे मिश्रण एकजीव होण्यास ठेवा.
2. आता कढईत तेल घालून त्यात खडा मसाला, तमालपत्र घालून चांगले परतवून घ्या. त्यात टोमॅटोची प्युरी घालून उकळी येऊ द्या. वरुन गरम पाणी घाला. त्यात मॅरिनेट केलेलं पनीर आणि सिमला मिरची घाला. सगळं साहित्य एकजीव करुन घ्या. फ्रेश क्रीम आणि कोथिंबीर घाला. तयार होईल कांदा-लसणाशिवाय हॉटेलसारखी पनीर-सिमला मिरची ग्रेव्हीची भाजी.