Lokmat Sakhi >Food > पालकाची भाजी पाहून मुले नाक मुरडतात? बनवा खमंग - कुरकुरीत पालक वडी, झटपट होणारा चविष्ट पदार्थ

पालकाची भाजी पाहून मुले नाक मुरडतात? बनवा खमंग - कुरकुरीत पालक वडी, झटपट होणारा चविष्ट पदार्थ

Palak vadi recipe: Crispy palak vadi recipe: Maharashtrian palak vadi: झटपट होणारा चविष्ट पदार्थ पालक वडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2025 10:25 IST2025-06-13T10:23:53+5:302025-06-13T10:25:20+5:30

Palak vadi recipe: Crispy palak vadi recipe: Maharashtrian palak vadi: झटपट होणारा चविष्ट पदार्थ पालक वडी

how to make palkachi vadi at home Crispy Maharashtrian recipe Healthy spinach snack | पालकाची भाजी पाहून मुले नाक मुरडतात? बनवा खमंग - कुरकुरीत पालक वडी, झटपट होणारा चविष्ट पदार्थ

पालकाची भाजी पाहून मुले नाक मुरडतात? बनवा खमंग - कुरकुरीत पालक वडी, झटपट होणारा चविष्ट पदार्थ

मुलांना बाहेरचे चटपटीत पदार्थ खायला जास्त आवडतात. त्यामुळे घरात बनवलेले पदार्थ खाताना अनेकदा नाक मुरडतात.(Palak vadi recipe) पालकाची भाजी फारशी घरात बनवली जात नाही. अगदी लहानांपासून-मोठ्यांपर्यंत अनेकांना ही भाजी आवडत नाही.(Crispy palak vadi recipe) पण पालकात असणारे पोषक घटक आपल्या मुलांना मिळावे असे प्रत्येकाला वाटते. चवीला थोडा कडवट असणारा पालक आरोग्यासाठी चांगला आहे.(Maharashtrian palak vadi) 
यात असणारे पोषक घटक तब्येतीसाठी चांगले असतात.(Tasty palak vadi without deep fry) पालकाची भाजीपेक्षा पराठे, सूप, कटलेट, भजी असे अनेक पदार्थ घरात चवीने खाल्ले जातात.(Palak vadi for kids tiffin) जर भाजी ऐवजी आपण पालकाची कुरकुरीत-खमंग वडी तयार केली तर सगळे आवडीने खातील, बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. (Homemade palak vadi in 10 minutes)

चपाती होईल मऊ लुसलुशीत, पीठ मळताना चिमूटभर घाला 'हा' पदार्थ-चपाती फुगेलही टम्म

साहित्य
बारीक चिरलेला पालक - २ कप 
बेसनाचे पीठ - १ कप 
तांदळाचे पीठ - २ चमचे 
आले-लसूण पेस्ट - १ चमचा 
हिरव्या मिरच्या - २ ते ३
हळद - अर्धा चमचा 
जिरे - १ चमचा 
धने पावडर - १ चमचा 
लाल मिरची पावडर - अर्धा चमचा
तीळ - १ चमचा 
बेकिंग सोडा - अर्धा चमचा 
मीठ - चवीनुसार 
पाणी 
तेल 



कृती 

1. सगळ्यात आधी पालक धुऊन बारीक चिरून घ्या. त्यानंतर एका बाऊलमध्ये चिरलेला पालक, बेसन आणि तांदळाचे पीठ घाला. 

2. आता त्यात आले-लसणाची पेस्ट, हिरवी मिरची, हळद, जिरे, धने पावडर, लाल तिखट, तीळ आणि बेकिंग सोडा, मीठ घाला. 

3. सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करुन घ्या. पाणी घालून त्याचे थोडे जाडसर मिश्रण तयार करा. 

4. तयार मिश्रणाचे लांब आकाराचे गोळे करा. ताटाला तेल लावून १० ते १२ मिनिटे वाफवून घ्या. शिजल्यानंतर थोडे थंड होऊ द्या. 

5. वड्यांचे काप करुन मंद आचेवर शॅलो फ्राय करा. टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा. 
 

Web Title: how to make palkachi vadi at home Crispy Maharashtrian recipe Healthy spinach snack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.