Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > ना रस आटवण्याची गरज ना प्रिझर्व्हेटिव्हची, १० मिनिटांत करा संत्र्याचा जाम! पाहा सोपी रेसिपी

ना रस आटवण्याची गरज ना प्रिझर्व्हेटिव्हची, १० मिनिटांत करा संत्र्याचा जाम! पाहा सोपी रेसिपी

orange jam recipe: homemade orange jam: quick jam recipe: 10 minute jam recipe: संत्र्याचा जाम कसा बनवायचा पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2026 09:30 IST2026-02-03T09:30:00+5:302026-02-03T09:30:07+5:30

orange jam recipe: homemade orange jam: quick jam recipe: 10 minute jam recipe: संत्र्याचा जाम कसा बनवायचा पाहूया.

how to make orange jam at home in 10 minutes preservative free homemade orange jam recipequick and easy orange jam without pectin healthy jam recipe for kids at Home homemade orange jam without preservatives | ना रस आटवण्याची गरज ना प्रिझर्व्हेटिव्हची, १० मिनिटांत करा संत्र्याचा जाम! पाहा सोपी रेसिपी

ना रस आटवण्याची गरज ना प्रिझर्व्हेटिव्हची, १० मिनिटांत करा संत्र्याचा जाम! पाहा सोपी रेसिपी

हिवाळ्यात बाजारात संत्री अधिक प्रमाणात पाहायला मिळतात. रसाळ, गोडसर आणि आंबट चव असलेली ही फळं केवळ रसासाठीच नाही, तर घरी झटपट जाम तयार करण्यासाठीही उत्तम पर्याय ठरतात.(orange jam recipe) सकाळचा घाईचा नाश्ता असो किंवा मुलांच्या डब्यासाठी झटपट काहीतरी बनवायचे असो, 'ब्रेड-जॅम' हा सर्वांचाच आवडता पर्याय असतो.(homemade orange jam) पण बाजारात मिळणाऱ्या जॅममध्ये मोठ्या प्रमाणावर साखर, कृत्रिम रंग आणि 'प्रिझर्व्हेटिव्ह्ज' असतात, जे मुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.(10 minute jam recipe) 
मुलांच्या आवडीचा जाम बनवायचे म्हटले की तासंतास आपल्या गॅसजवळ उभे राहावे लागते. पण काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्या तर तासंतास गॅसजवळ उभे राहण्याची गरज नाही. अनेकदा जाम घट्ट होण्यासाठी खूप वेळ लागतो. पण या रेसिपीमध्ये आपण एका खास नैसर्गिक घटकाचा वापर करणार आहोत, ज्यामुळे जाम झटपट तयार होतो. पाहूया सोपी रेसिपी. 

चहासोबत खा 'सुरणाचे चिप्स'; पाहा रेसिपी - सुरण म्हणताच पळणारे खातील चारवेळा मागून..

साहित्य 

संत्री - ५ ते ६ 
साखर - २ कप
अर्ध्या संत्र्‍याची साल 
लिंबू- १ 

कृती 

1. सगळ्यात आधी आपल्याला संत्री मध्यभागी कट करुन घ्यावी लागेल. त्यानंतर संत्रीचा रस काढून घ्या. संत्रीच्या सालीला चिकटलेला गर देखील काढून घ्या. 

2. अर्ध्या संत्रीच्या सालीचे बारीक तुकडे करा. आता एका पातेल्यात संत्र्याचा रस, त्याचा गर आणि सालीचे तुकडे घाला. वरुन साखर व अर्ध्या लिंबाचा रस घाला. 

3. आता गॅसवर तयार रसाचे मिश्रण ठेवून चमच्याने हलवत राहा. रस घट्ट झाल्यानंतर जाम तयार होईल. ब्रेड किंवा चपातीसोबत आवडीने खा, संत्र्याच्या सालीचा जाम 

4. या जामला प्रिझर्व्हेटिव्ह करण्याची गरज नाही. हवाबंद डब्यात आपण साठवून ठेवू शकतो. 


Web Title : 10 मिनट में संतरे का जैम: बिना प्रिजर्वेटिव, आसान रेसिपी!

Web Summary : घर पर 10 मिनट में बनाएं ताजा संतरे का जैम! यह आसान रेसिपी प्राकृतिक सामग्री का उपयोग करती है, जिससे प्रिजर्वेटिव और कृत्रिम रंगों से बचा जा सकता है। झटपट नाश्ते और बच्चों के स्नैक्स के लिए एकदम सही।

Web Title : 10-Minute Homemade Orange Jam Recipe: No Preservatives, Easy & Quick!

Web Summary : Make fresh orange jam at home in 10 minutes! This simple recipe uses natural ingredients, avoiding preservatives and artificial colors. Perfect for quick breakfasts and kids' snacks.