आपल्या भारतीय संस्कृतीत वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पदार्थांची चव चाखली जाते.(Kanda Lasun Masala recipe) महाराष्ट्रातील प्रत्येक भागात विविध प्रकारचा मसाला वापरला जातो.(Homemade Kanda Lasun Masala) ज्यामुळे पदार्थांची चव अधिक चांगली होते.(Onion garlic masala recipe) उन्हाळ्यात घरोघरी विविध प्रकारचे वर्षभर टिकतील असे मसाले केले जातात. कोणत्याही झणझणीत जेवणाची चव कांदा-लसूणशिवाय अपूर्णच (Maharashtrian Kanda Lasun Masala)तिखटाचा पदार्थ असो किंवा साधे जेवण असो यामध्ये हमखास काही पारंपरिक मसाले घातले जातात. त्यातील एक कांदा-लसूण मसाला. कांदा लसूण मसाला अनेकदा ग्रेव्ही करताना वापरला जातो. हा मसाला घरी करणे अगदी सोपा आहे. परंतु, अनेकदा आपल्याला जास्त प्रमाणात बनवायचा असला की, त्याचे प्रमाण चुकते. काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्यास मसाला बनवताना चुकणार नाही.
चमचमीत मसाला पाव खा, मुंबईच्या अस्सल स्ट्रीट फूडची मजाच न्यारी! पाहा टेस्टी मसाला पाव रेसिपी
साहित्य
लवंगी मिरची - सव्वा किलोशंकेश्वरी मिरची- सव्वा किलोरेशम पट्टी मिरची /पांडी मिरची - सव्वा किलोकाश्मिरी मिरची - सव्वा किलोधणे - सव्वा किलोतमालपत्र- ५० ग्रॅम दगडफूल- ५० ग्रॅम पांढरे तीळ - २५० ग्रॅम खसखस- २५० ग्रॅम जायफळ- २खडेहींग - ७५ ग्रॅमसूंठ - १५० ग्रॅमहळकुंड- ५० ग्रॅमजावित्री - ५० ग्रॅमदालचिनी -५० ग्रॅममेथीदाणे - २५ ग्रॅमकबाब चीनी- ५० ग्रॅमत्रिफळा- ५० ग्रॅमशहाजिरे- १०० ग्रॅममसाला वेलची- १०० ग्रॅमनागकेश्वर- ५० ग्रॅमहिरवी वेलची- १०० ग्रॅमलवंग- १०० ग्रॅमकाळी मिरी-१२५ ग्रॅम स्टारफुल- १०० ग्रॅमसाधे जिरे -५०० ग्रॅम मोहरी-२५० ग्रॅमलसूण -सव्वा किलो कांदा-अडीच किलो शेंगदाणा तेल-सव्वा किलो खडेमीठ - १ किलो सुके खोबरे -सव्वा किलो
कृती :-
1. सगळ्यात आधी मिरच्यांची देठ काढून उन्हात वाळवून घ्या. मिरच्यांचा रंग उडणार नाही याची काळजी घ्यावी.
2. त्यानंतर थोड्या तेलावर मिरच्या खमंग भाजून घ्या. यानंतर थोडे थोडे करुन सर्व मसाले करपू न देता खमंग भाजा.
3. आता कांदे उभे पातळ आकारात कापून घ्या. कढईत थोडे तेल घालून कांदा गुलाबी रंगावर परतवून घ्या. तेल सुटेपर्यंत कांदा भाजावा. कांद्यातील ओलावा संपल्यास मसाला अजिबात खराब होणार नाही.
4. खोबरे सुद्धा लालसर होईपर्यंत भाजून घ्या. सर्व गरम मसाले मिरच्यांवर घाला. धनेसुद्धा तेलावर खमंग भाजा.
5. खोबरे आणि कांदा वेगवेगळा ठेवा. मसाला दळण्यापूर्वी भाजलेले खोबरे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्याय कांदा सुद्धा बारीक वाटू शकता. लसूण वेगळा न भाजता खडा मीठ घालून वाटा.
6. अशाप्रकारे मसाला दळून आणा. थंड झाला की, कोरड्या बरणीत भरून ठेवा.