सध्याच्या धावपळीच्या जीवनात रोज स्वयंपाक करणं अनेकांना कठीण वाटतं. सकाळी घाईच्या वेळी ग्रेव्हीच्या भाज्या बनवणं अनेकदा कठीण असतं.(quick cooking hacks) कामाचा ताण, वेळेची कमतरता आणि रोज नवीन काय बनवायचं हा प्रश्न यामुळे अनेकजण हॉटेलच्या जेवणाकडे वळतात. पण बाहेरचं अन्न आरोग्यासाठी नेहमीच योग्य ठरत नाही. (smart kitchen tips)
प्रत्येक गृहिणीची इच्छा असते की तिने बनवलेल्या भाजीची चव अगदी हॉटेलसारखी असावी. पण रोजच्या घाईत कांदा-खोबरं भाजणं, वाटण करणं यातच खूप वेळ जातो.(everyday cooking ideas) मग अशा वेळी काय करावं? तर ते म्हणजे ग्रेव्ही एकदाच बनवू शकतो. ही एक अशी ग्रेव्ही आहे जी आपण एकदाच बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि हवी तेव्हा फक्त ५ मिनिटांत कोणतीही हॉटेल स्टाईल भाजी तयार करू शकता. ही ग्रेव्ही कशी बनवायची, यासाठी लागणारे साहित्य कोणते पाहूया.
शिळी झाली तरी कापसासारखी मऊ राहील चपाती! पीठ मळताना घाला २ सिक्रेट पदार्थ; चपाती होईल लुसलुशीत
साहित्य
कांदा - २ ते ३
टोमॅटो - २ ते ३
खरबूजाच्या बिया - ५० ग्रॅम
काजू - ५० ग्रॅम
सुक्या लाल मिरच्या - ७ ते ८
गरम पाणी - १ वाटी
आले- २ मोठे तुकडे
लसूण - १० ते १२ पाकळ्या
खडा मसाला
कृती
1. सगळ्यात आधी कांदा उभा चिरुन घ्या. त्यानंतर टोमॅटोच्या बिया काढून घ्या तो चिरुन घ्या. आता एका बाऊलमध्ये खरबूजाच्या बिया, काजू, सुक्या लाल मिरच्या आणि गरम पाणी घालून ठेवा.
2. यानंतर गरम पाण्यामध्ये कांदा, टोमॅटो, आले, लसूण आणि खडा मसाला घालून शिजवून घ्या. आता मिक्सरच्या भांड्यात गरम पाण्यात भिजवलेले साहित्य घाला. कांदा- टोमॅटोमधील खडा मसाला काढून घ्या. मोठ्या जाळीने त्यातील पाणी काढून शिजवलेले सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्या.
3. वाटलेला मसाला चाळणीने गाळून घ्या आणि चमच्याने ग्रेव्ही हलवा. आता भाज्या बनवताना त्यात तेल घाला. तयार ग्रेव्ही घालून त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने-जिरे पावडर, मीठ किंवा आवडीचे मसाले घालून ग्रेव्ही ढवळून घ्या.
4. तयार ग्रेव्ही आपण रेफ्रीजरेटरमध्ये स्टोर देखील करु शकतो. सकाळी घाईच्या वेळी, पाहुणे आल्यावर भाज्या सहज बनवता येतील.
