Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुरकुरीत- चटपटीत नागपूरची प्रसिद्ध 'सांबार वडी' करा घरीच; पारंपरिक चवीची खास रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2026 13:40 IST

Nagpur Sambar Wadi: Sambar Wadi recipe: Maharashtrian snack recipe: हॉटेलसारखी परफेक्ट सांबार वडी घरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूया.

महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीमध्ये प्रत्येक शहराची आपली अशी स्वतंत्र ओळख आहे. नागपूर म्हटलं की संत्री डोळ्यासमोर येतातच, पण खवय्यांच्या जगात नागपूरची खरी ओळख इथल्या सांबार वडीमुळे आहे.(Nagpur Sambar Wadi) विदर्भात कोथिंबीरला 'सांबर' म्हणतात आणि त्यापासून बनवलेली ही वडी म्हणजे अप्रतिम चव. ऋतू कोणताहो असो चहासोबत गरमागरम, खुसखुशीत आणि तिखट-गोड सांबर वडी खाण्याची मजा काही औरच असते. (Sambar Wadi recipe)अनेकदा ही सांबर वडी घरी बनवणं कठीण होत. कधी खूपच कडक होते तर कधी नरम पडते. ही वडी घरी बनवताना अनेकदा ती मऊ पडते किंवा तळताना फुटते.(Maharashtrian snack recipe) पण योग्य साहित्य आणि काही टिप्स लक्षात ठेवल्या तर ती अगदी परफेक्ट बनेल. हॉटेलसारखी परफेक्ट सांबार वडी घरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूया.  

वाटी इडली करा फक्त १५ मिनिटांत, ना इडली पात्राची गरज ना स्टँडची-जाळीदार मऊ इडली झटपट

साहित्य 

गव्हाचे पीठ - २ कपबेसनाचे पीठ - १/२ कप मीठ - चवीनुसार ओवा - १ चमचागरम तेल - ४ चमचेपाणी - आवश्यकतेनुसार जीरे - १ चमचाबडीशेप - १ चमचाधने - १ चमचाशेंगदाणे - १ कप आले - १ तुकडा हिरवी मिरच्या - ३ ते ४लाल मिरच्या - २ ते ३तेल - २ चमचेहिंग राई - अर्धा चमचा तीळ - १ चमचाखसखस - १ चमचाकिसलेले ओले खोबरे - ४ चमचेकाळे मीठ - चवीनुसार हळद पावडर - अर्धा चमचा लाल मिरची पावडर - अर्धा चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर - १ चमचाजीरे पावडर - अर्धा चमचासाखर - १ चमचा चिरलेला कोथिंबीर - १ कप आमचूर पावडर - १ चमचा चिंचेचा कोळ - १ छोटी वाटी तेल - तळण्यासाठी 

कृती 

1.  सगळ्यात आधी आपल्याला एका भांड्यात गव्हाचे पीठ, बेसन, मीठ, ओवा, गरम तेल आणि पाणी घालून पीठ मिळावे लागेल. मळलेलं पीठ काही वेळासाठी झाकून ठेवा. 

2. यानंतर जीरे, बडीशेप,धने कुटून घ्या. शेंगदाणे देखील जाडसर वाटा.  आता आले, हिरवी मिरची, लाल मिरची वाटा. कढईमध्ये तेल गरम करुन त्यात राई, हिंग, मिरची पेस्ट , कुटलेल जीरे-बडीशेप, तीळ, खसखस, किसलेला ओले खोबरे, काळे मीठ आणि इतर सर्व मसाले घाला. वरुन कोथिंबीर घालून सर्व साहित्य एकजीव करा. 

3. मळलेल्या पीठाला उभा आकार देऊन त्याला वडीसारखे कट करा. चपाती लाटून घ्या. आता तयार चपातीला चिंचेचा कोळ लावून त्यात तयार सारण भरा. पॉकेटसारखी वडी बंद करुन त्याचे रोल तयार करा. 

4. आता कढईत तेल गरम करुन वडी व्यवस्थित मंद आचेवर खरपूस तळून घ्या. चटणीसोबत खा नागपूरची फेमस सांबर वडी.  

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur's Famous Sambar Vadi Recipe: Crispy, Tangy Snack at Home

Web Summary : Make Nagpur's special Sambar Vadi at home! This Maharashtrian snack, a mix of spicy and sweet, is perfect with tea. The recipe uses wheat and besan flour for the outer layer and a flavorful mix of spices, coconut, and coriander for the filling.
टॅग्स :अन्नपाककृती