महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीमध्ये प्रत्येक शहराची आपली अशी स्वतंत्र ओळख आहे. नागपूर म्हटलं की संत्री डोळ्यासमोर येतातच, पण खवय्यांच्या जगात नागपूरची खरी ओळख इथल्या सांबार वडीमुळे आहे.(Nagpur Sambar Wadi) विदर्भात कोथिंबीरला 'सांबर' म्हणतात आणि त्यापासून बनवलेली ही वडी म्हणजे अप्रतिम चव. ऋतू कोणताहो असो चहासोबत गरमागरम, खुसखुशीत आणि तिखट-गोड सांबर वडी खाण्याची मजा काही औरच असते. (Sambar Wadi recipe)
अनेकदा ही सांबर वडी घरी बनवणं कठीण होत. कधी खूपच कडक होते तर कधी नरम पडते. ही वडी घरी बनवताना अनेकदा ती मऊ पडते किंवा तळताना फुटते.(Maharashtrian snack recipe) पण योग्य साहित्य आणि काही टिप्स लक्षात ठेवल्या तर ती अगदी परफेक्ट बनेल. हॉटेलसारखी परफेक्ट सांबार वडी घरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूया.
वाटी इडली करा फक्त १५ मिनिटांत, ना इडली पात्राची गरज ना स्टँडची-जाळीदार मऊ इडली झटपट
साहित्य
गव्हाचे पीठ - २ कप
बेसनाचे पीठ - १/२ कप
मीठ - चवीनुसार
ओवा - १ चमचा
गरम तेल - ४ चमचे
पाणी - आवश्यकतेनुसार
जीरे - १ चमचा
बडीशेप - १ चमचा
धने - १ चमचा
शेंगदाणे - १ कप
आले - १ तुकडा
हिरवी मिरच्या - ३ ते ४
लाल मिरच्या - २ ते ३
तेल - २ चमचे
हिंग
राई - अर्धा चमचा
तीळ - १ चमचा
खसखस - १ चमचा
किसलेले ओले खोबरे - ४ चमचे
काळे मीठ - चवीनुसार
हळद पावडर - अर्धा चमचा
लाल मिरची पावडर - अर्धा चमचा
काश्मिरी लाल मिरची पावडर - १ चमचा
जीरे पावडर - अर्धा चमचा
साखर - १ चमचा
चिरलेला कोथिंबीर - १ कप
आमचूर पावडर - १ चमचा
चिंचेचा कोळ - १ छोटी वाटी
तेल - तळण्यासाठी
कृती
1. सगळ्यात आधी आपल्याला एका भांड्यात गव्हाचे पीठ, बेसन, मीठ, ओवा, गरम तेल आणि पाणी घालून पीठ मिळावे लागेल. मळलेलं पीठ काही वेळासाठी झाकून ठेवा.
2. यानंतर जीरे, बडीशेप,धने कुटून घ्या. शेंगदाणे देखील जाडसर वाटा. आता आले, हिरवी मिरची, लाल मिरची वाटा. कढईमध्ये तेल गरम करुन त्यात राई, हिंग, मिरची पेस्ट , कुटलेल जीरे-बडीशेप, तीळ, खसखस, किसलेला ओले खोबरे, काळे मीठ आणि इतर सर्व मसाले घाला. वरुन कोथिंबीर घालून सर्व साहित्य एकजीव करा.
3. मळलेल्या पीठाला उभा आकार देऊन त्याला वडीसारखे कट करा. चपाती लाटून घ्या. आता तयार चपातीला चिंचेचा कोळ लावून त्यात तयार सारण भरा. पॉकेटसारखी वडी बंद करुन त्याचे रोल तयार करा.
4. आता कढईत तेल गरम करुन वडी व्यवस्थित मंद आचेवर खरपूस तळून घ्या. चटणीसोबत खा नागपूरची फेमस सांबर वडी.
